कोण आहे अबू इब्राहिम? स्वतःला उडवले बॉम्ब स्फोटाने| ISIS chief Abu Ibrahim killed | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi

कोण आहे अबू इब्राहिम? स्वतःला उडवले बॉम्ब स्फोटाने

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सीरियातील (Syria) अमेरिकन सैन्य दल (American military) आणि आयएसआयएस (ISIS) यांच्यातील संघर्षानंतर आयएसआयएस नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी मारला गेल्याचे सांगितले. अबू इब्राहिम अल-हाशिमी अल कुरैशीने स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना बॉम्ब स्फोटाने उडवल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा कोण आहे अबू इब्राहिम हे जाणून घेऊया...

अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी ज्याला अब्दुल्ला करादाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखले जाते. ते माजी आयएसआयएस (ISIS) प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला होता. अबू बकर अल-बगदादीने देखील २०१९ मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या अशाच हल्ल्यानंतर स्फोट घडवून स्वतःला ठार केले होते.

आता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल कुरैशीने स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना बॉम्ब स्फोटाने उडवले. या मोहिमेदरम्यान सहा मुले आणि चार महिलांसह १३ जणांचा मृत्यू झाला. २०१९ मध्ये ज्या भागात आयएसआयएसचा (ISIS) पूर्वीचा नेता अबू बकर अल-बगदादीचा अमेरिकेच्या विशेष सैन्याने खात्मा केला होता त्याच भागात अबू इब्राहिम ठार झाला, हे विशेष...

आम्ही ISIS विरोधात मोठा विजय मिळवला आहे. त्यांचा नेता अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशी मारला गेल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितले. २०११ मध्ये ओसाम बिन लादेनवर ज्याप्रमाणे हल्ला करून ठार केले त्याचप्रमाणेत हे ऑपरेशन राबवण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

हेही वाचा: सपा, अपना दलात (कम्युनिस्ट) फूट? काय आहे वादाचे कारण

बायडनच्या (Joe Biden) विधानानुसार, काल रात्री वायव्य सीरियामध्ये (Syria) अमेरिकन सैन्य दलांनी अमेरिकन लोकांचे आणि आमच्या सहयोगींचे रक्षण करण्यासाठी आणि जगाला एक सुरक्षित स्थान बनवण्यासाठी दहशतवादविरोधी ऑपरेशन यशस्वीपणे केले. आम्ही आयएसआयएसचा (ISIS) म्होरक्या अबू इब्राहिम अल-हाशिमी अल-कुरैशीला युद्धात ठार केले आहे. सर्व अमेरिकन ऑपरेशनमधून सुखरूप परतले आहेत.

याआधी स्थानिक सूत्रांनी अल जझीराला सांगितले की, तुर्कीच्या सीमेजवळ रात्रभर चाललेल्या कारवाईत किमान १२ लोक मारले गेले. ज्यामध्ये ७ मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याशी लढणाऱ्या बंडखोरांनी उत्तर-पश्चिम सीरियाच्या इदलिब प्रांतातील अटमेहजवळ एका परदेशी जिहादीच्या घराजवळ स्फोट ऐकले.

Web Title: American Military Syria Isis Chief Abu Ibrahim Killed Joe Biden

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..