जबरा फॅन! रॉकस्टारच्या ६ केसांसाठी मोजले 10 लाख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जबरा फॅन! रॉकस्टारच्या ६ केसांसाठी मोजले 10 लाख

जबरा फॅन! रॉकस्टारच्या ६ केसांसाठी मोजले 10 लाख

मनोरंजन क्षेत्रात आजवर आपण असंख्य रॉकस्टार (rockstar) पाहिले असतील. आवाजासोबतच हटके स्टाइलस्टेटमेंटसाठीही हे रॉकस्टार ओळखले जातात. त्यामुळे असंख्य चाहते या सेलिब्रिटींना फॉलो करत असतात. तसंच या रॉकस्टार्सची एखादी वस्तू लिलावात ठेवली तर काही चाहते कोटयवधी रुपये खर्च करुन ती वस्तू विकत घेतात. विशेष म्हणजे सध्या अशाच एका रॉकस्टार व त्याच्या चाहत्याची चर्चा रंगली आहे. कर्ट कोबेन (kurt cobain) या रॉकस्टारचे ६ केसांचा लिलाव झाला असून चक्क १० लाख रुपयांना त्यांची विक्री करण्यात आली आहे. (american rockstar kurt cobain 6 hair auction in more than 10 lakh rupees)

अमेरिकन गायक कर्ट कोबेन यांनी १९९४ साली जगाचा निरोप घेतला. मात्र, त्यांची लोकप्रियता अद्यापही कमी झालेली नाही. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांच्या केसांचा लिलाव करण्यात आला. यावेळी एका चाहत्याने कर्ट कोबेनच्या ६ केसांसाठी चक्क १० लाख रुपये मोजले.

हेही वाचा: मातृभूमीप्रेम! USA ची नोकरी सोडून सुरु केला दुग्धव्यवसाय

आयकॉनिक ऑक्शनमध्ये १४१४५ डॉलर्स म्हणजे जवळपास १० लाख रुपयांना त्यांच्या केसांचा लिलाव झाला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कर्ट कोबेन यांचे केस जपून ठेवण्यात आले होते. कर्ट कोबेन यांच्या निर्वाणाचा पहिला अल्बम प्रदर्शित झाल्यानंतर चार महिन्यानंतर त्यांनी हेअरकट केला होता. कार्ट यांचा मित्र ओसबॉर्नने ऑक्टोबर १९८९ मध्ये त्यांचा हेअरकट केला होता.

कर्ट कोबेन केली आत्महत्या

अमेरिकेतील प्रसिद्ध गायक, गीतकार, गिटारिस्ट अशी कर्ट कोबेन यांची ओळख होती. तसंच त्यांचा निर्वाणा बॅण्ड लोकप्रिय बॅण्डदेखील होता. विशेष म्हणजे वयाच्या केवळ २७ व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातं. ५ एप्रिल १९९४ मध्ये त्यांनी स्वत: वर गोळी झाडून घेतली आणि जीवनाचा अंत केल्याचं सांगितलं जातं.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :rockstar
loading image
go to top