जॉगिंगला जाताना आवडायची मग केला बलात्कार...

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

पळत असणारी महिला आवडू लागली मग... एके दिवशी मोटारीने महिलेला धडक देऊन बेशुद्ध केले व त्याच अवस्थेत बलात्कार केला.

न्यूयॉर्क: एका अमेरिक महिलेला पळण्याची आवड होती. त्या दररोज पळण्यासाठी जात. यावेळी एकाची महिलेवर नजर गेली. पळत असणारी महिला आवडू लागली मग... एके दिवशी मोटारीने महिलेला धडक देऊन बेशुद्ध केले व त्याच अवस्थेत बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.

बलात्कार करून हत्या केल्याची घटना ग्रीसमध्ये घडली असून, 27 वर्षाच्या युवकाला अटक करण्यात आली आहे. बलात्कार करून हत्या करण्यात आलेली अमेरिकन महिला वैज्ञानिक होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सुझानी इटॉन (वय 59) या वैज्ञानिक असून, एका परिषदेसाठी ग्रीसमध्ये गेली होती. त्यांना दररोज सकाळी 30 मिनिटे पळण्याची आवड होती. तेथेही त्या पळण्याचा सराव करत होत्या. यावळी 27 वर्षाचा शेतकरी त्यांना पाहू लागला. पीडित महिला ग्रीसच्या क्रिटी बेटावर पळण्याचा सराव करत असताना आरोपीच्या गाडीने महिलेला पाठीमागून धडक दिली. वाहनाच्या धडकेमुळे त्या बेशुद्ध पडल्या. आरोपीने पीडित महिलेला उचलून गाडीत ठेवले व निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने बलात्कार करुन हत्या केली व मृतदेह दुसऱ्या महायुद्धातील एका बंकरमध्ये फेकून दिला. मृतदेह बंकरमध्ये टाकल्यानंतर बंकरचे प्रवेशद्वार लाकडांनी बंद केले, अशी माहिती आरोपीने पोलिसांना तपासादरम्यान दिली.

दरम्यान, या प्रकरणी 27 वर्षीय शेतकऱ्याला अटक करण्यात आली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पोलिसांनी त्याचे नाव प्रसिद्ध केलेले नाही. पीडित महिलेचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: American scientist killed in Greece was raped