Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव
Anna Bhau Sathe : मास्कोमध्ये अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा रशियाकडून गौरव करण्यात आला आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अण्णाभाऊंचा पुतळा, तैलचित्र उभारण्यात आले आहे. यांचे अनावरण आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हंटलं की, रशियात भारतीय संस्कृती जपल्याचा गर्व वाटत आहे. जे वंचितांचे आवाज होते. ज्यांना आयुष्यात एकदाच शाळेत जाण्याचा अनुभव होता. 227 किमी चालून तो व्यक्ति पुण्यात आला. शिक्षण नसतानाही पुस्तके, कथा, पोवाडे लिहले. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतीय स्वतंत्रता संग्राममध्ये तसेच गोव्याच्या मुक्ती संग्रामद्धे ज्यांच महत्वपूर्ण योगदान आहे. यांचा गौरव आज रशियाने केला याचा मला गर्व वाटतो आहे. त्याचबरोबर मला या लोकार्पण सोहळ्याची संधी दिली याबद्दल आभारी आहे असंही ते पुढे बोलताना म्हणालेत.

महाराष्ट्रभूमीचे महान सुपूत्र साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याच्या कतृत्वाचा आणि भारत रशिया संबधांच्या दृढीकरणाच्या अनुषंगाने अण्णा भाऊंनी केलेल्या महान कार्याला सलामी म्हणून मॉस्को रशिया येथील मार्गारिटा रुडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर या प्रसिद्ध ग्रंथालय संस्थेने अण्णा भाऊंचा अर्धाकृती पुतळा मॉस्को शहराच्या मधोमध अनेक आंतरराष्ट्रीय विभूतींच्यासोबत बसविला आहे. या पुतळ्याचे व तैलचित्राचे आज अनावरण करण्यात आले आहे. रशियाच्या मॉस्कोमध्ये डिप्लोमॅटिक रिलेशन्सन इन आर्ट कल्चर अँड लिटरेचर येथे आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com