
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तानातील सध्याच्या तणावावर संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस लक्ष ठेऊन आहेत. ‘‘दोन्ही देशांनी संयम बाळगावा आणि परिस्थिती आणखी चिघळणार नाही, याची काळजी घ्यावी,’’ असे आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या प्रवक्त्यांनी केले आहे.