कोरोना लसीची घाई हानिकारक; वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता

कोरोना लसीची घाई हानिकारक; वैद्यकीय तज्ज्ञांना चिंता

न्यूयॉर्क - कोरोना व्हायरसवरील लसीच्या संशोधनात जगभरात स्पर्धाच सुरू झाली आहे. औषध कंपन्या, संशोधन संस्था रोज वेगवेगळे दावे करीत आहेत. कोरोनावरील लस लवकरच येईल आणि मग मास्क व सुरक्षित अंतराचा नियम पाळण्याची गरज उरणार नाही, अशी आशा लोकांना वाटत आहे. मात्र ही स्पर्धा व हातघाई होत असल्याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वैद्यकीय तज्ज्ञांचा इशारा 
- घाईत तयार केलेली लस गुणकारी ठरण्यापेक्षा हानिकारक ठरू शकते 
- पोलिओ नियंत्रणासाठी १९५५ मध्ये साल्क पोलिओ लस आणण्यात घाई झाल्याने जिवावर बेतले होते 
- मोठ्या प्रमाणावर लस निर्मितीत गडबड झाल्याने ७० हजार मुले पोलिओग्रस्त झाली होती. दहा जणांचा बळी गेला होता. 

कोरोनाची लस लवकर आणण्यासाठी दबाव टाकल्यास तिच्या परिणामकारकतेबाबत शंका निर्माण होऊन डॉक्टरांवरील विश्‍वास कमी होऊ शकतो. 
डॉ. ब्रिट ट्रोजन, बालरोग विभागाचे निवासी डॉक्टर, 
एनवाययू लगून मेडिकल सेंटर अँड बेलव्ह्यू हॉस्पिटल 

लसीच्या गुणाबद्दल चिंता 
- कोणत्याही लसीमुळे रुग्णाचा आजार १०० टक्के बरा होत नाही 
- फ्लूवरील लस दिली तरी अशांना आजार होऊ शकतात 

गंभीर आजारांच्या प्रतिबंधासाठी ५० टक्के परिणामकारक ठरणारी लसीलाही मान्यता मिळू शकते. 
डॉ. पॉल ए. ऑफिट, लसीकरण विकास क्षेत्रातील तज्ज्ञ 

मर्यादित चाचणी अव्यवहार्य 
- लाखो लोकांवर चाचणी झाल्याशिवाय लसीचा परिणाम व सुरक्षितता समजणार नाही 
- सामान्य परिस्थितीत या प्रक्रियेला अनेक वर्षे लागू शकतात 
- कोरोनावरील लस मात्र काही महिन्यांत तयार होत असल्याने चुका होण्याची शक्यता जास्त 

लोकांना गुणकारी लस लवकरात लवकर उपलब्ध करून देताना आपण सुरक्षेबाबत तडजोड करू शकत नाही. 
डॉ. फ्रान्सिस कॉलिन्स, संचालक, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ 

लसीची स्वीकृती 
- लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यासाठी ७० टक्के परिणामकारता हवी 
- रोगप्रतिकारशक्तीचा प्रभाव पुढील काही महिन्यांपर्यंत कळणे कठीण 
- गंभीर आजारी रुग्ण आणि ज्यांच्यात लक्षण दिसत नाही, अशांमध्ये संक्रमण रोखण्यास गुणकारी ठरणाऱ्या लसीलाच मान्यता मिळू शकते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com