अ‍ॅप्पलच्या सीईओंना पडली भारतीय फोटोग्राफरच्या फोटोची भुरळ!

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

'वर्ल्ड फोटोग्राफी डे'च्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले काही फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरुण आदित्य याच्याही फोटोचा समावेश आहे.

कॅलिफोर्निया : जगभर काल 'वर्ल्ड फोटोग्राफी डे' साजरा करण्यात आला. मोबाईल ते डीएसएलआर वर आपल्या फोटोग्राफीची कला आजमावून बघणाऱ्या प्रोफेशनल आणि स्वयंघोषित अशा सर्व फोटोग्राफरनी त्यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. या फोटोंची कुणी दखल घेतली कुणी घेतली नाही, हा प्रश्न वेगळा. मात्र, एका भारतीय फोटोग्राफरने काढलेला एक फोटो अ‍ॅप्पलचे सीईओ टीम कुक यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केला आहे. 

'वर्ल्ड फोटोग्राफी डे'च्या निमित्ताने त्यांनी आयफोनमधून काढलेले काही फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले. यामध्ये भारतीय फोटोग्राफर वरुण आदित्य याच्याही फोटोचा समावेश आहे. मूळचे भारतीय असलेले वरुण हे वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत. केनियामधील एंबोसेलीमध्ये गेल्यावर वरूण यांनी हत्तींसोबत इंद्रधनुष्याचा काढलेला एक सुंदर फोटो कुक यांनी अपलोड केला आहे. त्यांच्या अनेक फोटोंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनामध्ये मानाचे स्थान असते. 

आमच्या ग्राहकांनी आयफोनवर काढलेल्या अशाच सुंदर फोटोंमुळे आम्हाला दररोज प्रेरणा मिळते, असे कुक यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Apples CEO tweet about Indian photographers photo