
काबुलमध्ये दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र हल्ले करताना मानवतेला काळीमा फासला. रुग्णालयातील प्रसूती वॉर्ड आणि एका पोलिसाची अंत्ययात्रा अशा ठिकाणी बेछूट गोळीबार करण्यात आला. यात आतापर्यंतच्या वृत्तानुसार ३७ जणांचा बळी गेला आहे.
काबुल - काबुलमध्ये दहशतवाद्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सशस्त्र हल्ले करताना मानवतेला काळीमा फासला. रुग्णालयातील प्रसूती वॉर्ड आणि एका पोलिसाची अंत्ययात्रा अशा ठिकाणी बेछूट गोळीबार करण्यात आला. यात आतापर्यंतच्या वृत्तानुसार ३७ जणांचा बळी गेला आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मंगळवारी सकाळी प्रसूतीगृहातील हल्यात दोन बालके तसेच ११ माता व परिचारिकांचा बळी गेला. याशिवाय १५ जण जखमी झाले असून यातील अनेक मुले आहेत. या रुग्णालयाचा काही भाग मेडीसीन्स सॅन्स फ्रॅंटीयर्स या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमार्पत चालविला जातो आणि तेथे काही परदेशी नागरिक काम करतात. हल्याच्या वेळी सुमारे १८० लोक रुग्णालयात होते. एक डॉक्टर पळून गेल्याने बचावला. त्याने ही माहिती दिली. सुरक्षा दलाने तीन परदेशी नागरिकांसह १०० महिला व मुलांची सुटका केली. हल्लेखोरांनी पोलिस अधिकाऱ्यांचे गणवेश घातले होते. नंतर ते सुरक्षा दलाकडून मारले गेले. या हल्यात हात असल्याचा तालिबानने इन्कार केला आहे.
दरम्यान, नांगरहार येथे एका स्थानिक पोलिस कमांडरच्या अंत्ययात्रेवर बाँबहल्ला करण्यात आला. अंत्यविधीतील अखेरची प्रार्थना सुरू असताना आत्मघातकी हल्ला झाला. त्यात २४ जणांचा बळी गेला असून ६८ जखमी झाले. मृतांची ओळख पटणे अवघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.