पाडलेले ड्रोन चीन, पाकमध्ये उडवलेले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arms smuggling Forensic Report of the Border Security Force Downed drones flown in China Pakistan

पाडलेले ड्रोन चीन, पाकमध्ये उडवलेले!

नवी दिल्ली : गेल्यावर्षी अमृतसर जिल्ह्यातील राजाताल सीमा चौकीनजिक पाडण्यात आलेला ड्रोन त्या आधी चीन तसेच पाकिस्तानमध्ये उडविण्यात आला होता. सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने न्यायवैद्यक तपासणी अहवालाच्या आधारे ही माहिती दिली.

याप्रकरणी प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी २५ डिसेंबर रोजी ड्रोन पाडण्यात आला होता. त्याआधी ११ जून रोजी चीनच्या शांघायमधील फेंगशीयान जिल्ह्यात तो उडविण्यात आला होता. त्यानंतर २४ सप्टेंबर ते २५ डिसेंबर दरम्यान पाकिस्तानमधील पंजाबच्या खानेवाल जिल्ह्यात २८ वेळा ड्रोन फिरविण्यात आल्याचे आढळून आले.

सीमा सुरक्षा दलाने ड्रोनच्या न्यायवैद्यक तपासणीसाठी दिल्लीत एक प्रयोगशाळा उभारली आहे. गेल्या वर्षी सीमा सुरक्षा दलाने २२ ड्रोन किंवा मानवविरहित हवाई वाहने पाकिस्तान सीमेलगत पाडली. या सर्व घटना पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत घडल्या. या ७५ टक्के घटनांमध्ये शस्त्रे किंवा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आला.

डाव ड्रोनचा

  • २२८९ किमी -पाक सीमेचे अंतर

  • ७७ ड्रोन पाडल्याच्या २०२० मधील घटना

  • १०४ ड्रोन पाडल्याच्या २०२१ मधील घटना

  • ३११ ड्रोन पाडल्याच्या २०२२ मधील घटना