चीनची कोरोना लस 'सुसाट'; जगभरात ५० हजार लोकांवर होतंय परिक्षण

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 6 September 2020

कोरोना लशीच्या विकासात चीनची 'चायना नॅशनल बायोटेक ग्रुप' China National Biotec Group (CNBG) कंपनी वेगाने पुढे जाताना दिसत आहे

बिजिंग- कोरोना लशीच्या विकासात चीनची 'चायना नॅशनल बायोटेक ग्रुप' China National Biotec Group (CNBG) कंपनी वेगाने पुढे जाताना दिसत आहे. जगभरातील अनेक देशातील ५० हजार स्वयंसेवकांवर चीनच्या कोरोना लशीचे तीसऱ्या टप्प्यातील third phase of clinical trials परिक्षण घेतले जात आहे. कंपनीने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली आहे. 

कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील CNBG लशीचे vaccine परिक्षण वेगाने पुढे जात आहे. याआधी घेण्यात आलेल्या दोन टप्प्यांमध्ये लस प्रभावी असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवाय या लशीचे कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाहीत. जगातील अनेक देशांमध्ये आम्ही लशीचे परिक्षण घेत आहोत. यात बहारीन, संयुक्त अरब अमिराती, पेरु, अर्जेंटिना यांचा समावेश होतो. परिक्षणसाठी ५० हजार लोकांनी सहभाग घेतला आहे, अशी माहिती  CNBG कंपनीने पत्रक जाहीर करुन दिली आहे.

चीनच्या दोन ते तीन कोरोना लशी प्रगतीपथावर आहेत. CNBG ची लस त्यापैकी एक आहे. या कंपनीने मानवी चाचणीचे दोन टप्पे पार केले असल्याचं सांगण्यात आलं आहे. चीनच्या कोरोना लशीमध्ये उझबेकिस्तान आणि पाकिस्तान या देशांनीही रस दाखवला आहे. त्यामुळे या देशातील कोरोना लशीचे परिक्षण घेतले जाणार असल्याची माहिती काही माध्यमांनी दिली आहे. 

'संविधानाचे रक्षक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केशवानंद भारती यांचे निधन

कोरोना विषाणूविरोधात प्रभावी ठरणारी लस तयार करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार सध्या १२० पेक्षा अधिक उमेदवार कोरोनावरील प्रभावी लस निर्माण करण्याच्या कामात गुंतले आहेत. त्यातील ५ ते ६ उमेदवार मानवी चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचले आहेत. त्यामुळे या वर्षीच्या शेवटापर्यंत किंवा २०२१ च्या सुरुवातीला कोरोना लस बाजारात येण्याची शक्यता आहे. असे असले तरी चीनने आपल्या नागरिकांना कोरोना लशीचा डोस देण्याचे सुरु केल्याची बातमी समोर आली होती. तसेच चीनने आपल्या सैनिकांना लस दिली असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, रशियाने कोरोनावरील प्रभावी लस तयार केल्याचा दावा केला आहे. शिवाय रशियाने आपल्या 'स्फुटनिक व्ही' लशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरु केले आहे. ऑगस्ट महिन्यात रशिया लशीकरण मोहीत हाती घेणार असल्याची माहिती आहे. मेडिकल जर्नल लॅसेंटने रशियाची कोरोना लस सुरक्षित आणि दुष्परिणामविरहित असल्याचं सांगितलं आहे. 

(edited by- kartik pujari)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Around 50000 people participating in phase 3 clinical trials of a COVID vaccine developed by the China