अवकाशयानाच्या केबिनचे दर्शन

वृत्तसंस्था
गुरुवार, 30 जुलै 2020

अवकाशयानात तरंगण्यासाठीही तशी मोकळीक मिळण्याची प्रत्येकाची अपेक्षा असेल.   शेवटी तेथील क्षणांचे छायाचित्रण करण्याची आणि तेथून दिसणारे दृश्य टिपण्याची प्रत्येकाची इच्छा असणार....

मोहावी, कॅलिफोर्निया - अवकाश पर्यटनाचा संकल्प सोडलेल्या व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीने आपल्या अवकाशयानाच्या केबिनचे पहिले दर्शन घडविले आहे. व्हर्च्युअल माध्यमातून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना याची माहिती देण्यात आली. या वर्षाच्या अखेरीस उड्डाण करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

सोशल-मीडियाचा विचार
अवकाश पर्यटन करणाऱ्यांसाठी एैसपैस खिडक्या अनिवार्य मानल्या गेल्या आहेत. अवकाशयानात तरंगण्यासाठीही तशी मोकळीक मिळण्याची प्रत्येकाची अपेक्षा असेल. शेवटी तेथील क्षणांचे छायाचित्रण करण्याची आणि तेथून दिसणारे दृश्य टिपण्याची प्रत्येकाची इच्छा असणार. मुख्य म्हणजे हे सारे सोशल मीडियावर पोस्ट केले जाणार याचा विचार कंपनीने केला आहे. त्यासाठी १२ खिडक्या आणि १६ कॅमेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

अवकाश पर्यटनाची स्पर्धा
भरभराटीस येण्याची अपेक्षा असलेल्या अवकाश पर्यटन उद्योगात रिचर्ड ब्रॅन्सन यांची कंपनी एकमेव नाही
अॅमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक जेफ बेझोस यांच्याकडून ब्लू ओरीजीनची स्थापना
खासगी अवकाश पर्यटनाचा विस्तार करण्याची योजना
एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नॉलॉजीज कॉर्पकडूनही तयारी
दक्षिण टेक्सासमध्ये भव्य स्टारशीपची बांधणी सुरु
 चंद्रावर अंतराळवीर नेण्याची तसेच मंगळावर वसाहत उभारण्याची एलॉन मस्क यांना आशा

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

  उड्डाणाविषयी
व्हर्जिन गॅलॅक्टिक लाँचपॅडवरून नव्हे तर मोठ्या विमानातून (कॅरिअर प्लेन) अवकाशात सोडले जाणार
मग दोन वैमानिक आणि सहा प्रवासी पृथ्वीपासून 68 मैल उंचीवर हवाईसफरीचा आनंद लुटणार
68 मैल ही उंची नासानुसार तांत्रिकदृष्ट्या अवकाश ठरते
45 हजार फूट किंवा जास्त उंचीवरून कॅरिअर प्लेन अवकाशयान सोडणार
त्यानंतर अवकाशयान रॉकेट इंजिन सुरु करणार
येत्या काही वर्षांत पाच अवकाशयानांच्या उड्डाणाची योजना

त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्तारीकरणाची योजना

वेळ अन्् तिकीट
अवकाश सफारीचे वेध लागले असतील तर 90 मिनिटांच्या अनोख्या अनुभवासाठी किमान दोन लाख 50 हजार डॉलर इतके तिकीट असेल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 व्हर्जीनच्या  अवकाश  सफारीची वैशिष्ट्ये
पर्यटकाची मनोवस्था प्रफुल्लित करण्यासाठी प्रकाशयंत्रणेचा वापर
दीर्घ कालावधीच्या विमान प्रवासात याचा अवलंब
विशिष्ट क्षणी सर्व दिवे बंदही केले जातात

स्वतःचा शोध आणि परिवर्तन घडविण्यासाठी प्रत्येक अंतराळ पर्यटकाला उत्कट अनुभव मिळेल याची दक्षता आम्ही घेतली नाही. त्यांचे लक्ष विचलीत करणार नाही अशी सुरक्षितताही असेल. त्यांना अवकाश सफारीचा शांतचित्ताने अनुभव घेता येईल. ग्राहकांना कमाल अनुभूती देण्याची संकल्पना केंद्रस्थानी ठेवून आम्ही अवकाशयानाची निर्मिती केली आहे.
- रिचर्ड ब्रॅन्सन, ब्रिटिश उद्योगपती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about first look inside virgin galactics spaceship cabin