
पंढरपूरची वारी, विठ्ठलाच्या नामाचं वेड जसे संपूर्ण महाराष्ट्राला आहे तसेच सातासमुद्रापार पण आहे. अमेरिकेतील ऑस्टिन टेक्सास येथील श्रीगजानन महाराज अमेरिका भक्त परिवाराने मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा व आषाढी वारीचा उत्सव येथील श्री सनातन मंदिरात नुकताच साजरा केला. या वारीत ऑस्टिन मधील साधारणत: ३५० वारकऱ्यांचा सहभाग होता.