
आशिया खंडात पुन्हा एकदा कोविड-19 ने डोके वर काढले आहे. हाँगकाँग आणि सिंगापूर या दोन जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोविड-19 च्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आरोग्य यंत्रणांनी नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि लसीकरण अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला आहे.