esakal | टाइम मासिकाने विचारले; फेसबुक ठेवायचे की उडवायचे?IFacebook
sakal

बोलून बातमी शोधा

टाइम मासिकाने विचारले; फेसबुक ठेवायचे की उडवायचे?

टाइम मासिकाने विचारले; फेसबुक ठेवायचे की उडवायचे?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क (पीटीआय): जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाने फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांचे छायाचित्र मुखपुष्ठावर प्रकाशित केले असून ‘फेसबुक डिलीट करावे की ठेवावे’, असा सवाल वाचकांना केला आहे. टाइम मासिकाच्या मुखपृष्ठ पटकथेत म्हटले की, फेसबुकमुळे मुलांचे नुकसान होत आहे. फेसबुकचे लक्ष सुरक्षेऐवजी नफा कमावण्याकडे आहे. मासिकाच्या मुखपृष्ठावर झुकेरबर्ग यांचा फोटो असून त्यात ॲप डिलीट करण्याचे आयकॉन दाखवले आहे. हा ॲप डिलीट करायचा की ठेवायचा असा प्रश्‍न वाचकांना विचारला आहे.

फेसबुकच्या माजी कर्मचारी, माहिती तज्ज्ञ फ्रान्सेस हॉगन यांच्याकडून फेसबुकबाबत खळबळजनक खुलासे केले जात आहेत. त्यांनी या आठवड्यात अमेरिकी सिनेटच्या ग्राहक संरक्षक समितीसमोर फेसबुक कंपनीकडून नागरिकांची सुरक्षा धोक्यात आणून कशा रीतीने नफा कमावला जात आहे, याच पाढा वाचला होता. फेसबुक प्लॅटफॉर्मचा वापर हिंसाचार पसरविण्यासाठी केला जात आहे. या गोष्टी रोखण्यासाठी कंपनीकडून केले जाणारे उपाय हे खूपच त्रोटक आहेत, असा दावा केला. यादरम्यान टाइम मासिकाने झुकेबरर्ग यांचे छायाचित्र प्रकाशित पुन्हा एकदा फेसबुकच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्‍न उपस्थित केले. ‘फेसबुक उडवायचे?: रद्द किंवा उडवा असा प्रश्‍न वाचकांना विचारला आहे. यासंदर्भात प्रकाशित झालेल्या मुखपृष्ठकथेचे शीर्षक ‘हाऊ फेसबुक फोर्स्ड ए रेकनिंग बाय शटिंग डाउन द टीम दॅट पुट पीपल अहेड प्रॉफिट’ असे आहे. या लेखाचे लेखक बिली पेरिगो म्हणतात, की, फेसबुकची भविष्यातील वाटचाल कशीही असली तरी तेथे असंतोष धुमसत आहे. हॉगन यांनी कागदपत्रे लीक केल्याने आणि खासदारांना माहिती दिल्याने सोशल मीडियासंदर्भातील नियम आणखी कडक होण्यास मदत मिळाली आहे.

loading image
go to top