हा तर ‘ब्रेन ड्रेन’वरचा उपाय!

हा तर ‘ब्रेन ड्रेन’वरचा उपाय!

अमेरिकेला सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावते आहेच. ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ अशी घोषणा देत तेथील अर्थव्यवस्था आणि रोजगारांची स्थिती सुधारण्यासाठी निवडणुकांच्या वेळीच आश्‍वासन दिले होते आणि ते आता ‘एच-१ बी’ व्हिसासारखे निर्णय घेऊन त्याचीच अंमलबजावणी करताना दिसत आहेत. सध्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये (आयटी) ऑटोमेशनमुळे नोकऱ्यांचे प्रमाण घटते आहे. मॅन्युअल टेस्टिंगचे प्रमाण कमी होत असल्याने अनेकांच्या नोकरीवर कुऱ्हाड आली आहे. तरीही, तेथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांचे स्किल पाहता त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्‍यता कमी असली, तरी काही लाखांत नोकऱ्या जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

यावर उपाय म्हणून तेथील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांनी वेगळे पर्याय शोधायला हवेत. सध्या आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांपैकी अनेक जण शैक्षणिक क्षेत्रामध्ये नोकरीसाठी अर्ज दाखल करीत असल्याचे चित्र आहे. भारतात परत आलेल्यांना येथील आयटी क्षेत्रामध्ये चांगल्या संधी मिळतील. सुरवातीला नोकऱ्यांचे प्रमाण कमी असेल; मात्र नंतर स्थिती सुधारेल. वयाची चाळिशी ओलांडलेल्यांना थोडा त्रास होऊ शकतो. प्रत्येकच क्षेत्रामध्ये चढ-उतार हे होतच असतात, सध्या आयटी क्षेत्रात ही स्थिती आहे. भारतामध्ये बॅंकांची स्थिती तशी आहे. अनेक मोठ्या बॅंका ऑटोमेशनमुळे प्रत्येक शहरात एकच शाखा सुरू ठेवण्याचा विचार करीत आहेत. अशा स्थितीत अनेकांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. हा तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावाचा परिणाम आहे आणि अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचा दुसरीकडे उपयोग करून घेणे, हाच पर्याय कंपन्यांकडे असतो. 

अमेरिकेमध्ये कायम वास्तव्य करण्याची संधी असल्यामुळेच या प्रगत देशाकडे जाण्याचा अनेकांचा कल होता. थोड्या कालावधीसाठी नोकरी मिळणार असल्यास कोणीच धोका पत्करत नाही. अमेरिकेतील आयटी क्षेत्रात हेच घडले. ग्रीन कार्ड मिळत असल्याने अनेकांनी तेथील नोकऱ्या स्वीकारल्या. ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड नाही, त्यांना या परिस्थितीत भारतात परत यावे लागू शकते. याला दुसरी सकारात्मक बाजूही आहे. या निर्णयामुळे भारतातील टॅलेंट परत येऊन देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावू शकते. वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या ‘ब्रेन ड्रेन’च्या समस्येवरचा हा इलाज ठरावा.

‘एच-१ बी’ व्हिसासाठीचे जगभरातील एकूण अर्ज
वर्ष    अर्जांची संख्या     मान्यता                          
२०११        २,६८,४१२     २,०७,२५३
२०१२         ३,०८, २४२     २,४०, ४४० 
२०१३         २,९९,६९०        २,३२,९७८
२०१४          ३,२५,९७१             २,५९,८१२
२०१५          ३,६८,८५२           ३,०७,१२९
२०१६          ३,९९,३४९           ३,४८, १६२
२०१७          ३,३६,१०७          १,९७,१२९

देशानुसार विभागणी 
देश             २०११        २०१७

भारत       १,५५,७९१    २,४७,९२७ 
चीन         २३,२२७        ३६,३६२ 
फिलिपिन्स      ९,०९८    ३,१६१ 
द. कोरिया     ७,४८०    ३,२०३ 
कॅनडा          ६,७६१     ३,५५१ 
तैवान          ४,५११     २,२०० 

स्रोत - (यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस रिपोर्ट)

संधीचा उपयोग करा...
अमेरिकेच्या एच-१ बी व्हिसासंदर्भातील निर्णयामुळे भारतातील स्टार्टअपमध्ये मोठी गुंतवणूक होईल. कदाचित त्यातील काही जागतिक पातळीवरही पोचतील. प्रत्येक समस्येमध्ये एक संधी दडलेली असते. 
- ए. एम. स्वामी

सिलिकॉन व्हॅलीमध्ये ६६ टक्के भारतीय काम करतात. अमेरिका सरकारच्या या निर्णयाचा फटका त्यांच्याच अर्थव्यवस्थेला बसणार आहे. 
- अरुणकुमार

धन्यवाद ट्रम्पसाहेब. तुमच्या एकाच निर्णयामुळे भारतीय वधूंचे एनआरआय वरांबद्दलचे आकर्षण कमी होईल आणि त्या भारतीय मुलांमध्ये रस घेतील!
- संजीव भट

एच-१ बी व्हिसाधारकाबरोबर विवाह करू इच्छिणाऱ्या वधूंसाठी मी शोक व्यक्त करतो. ट्रम्पसाहेबांनी तुमचं वॉलमार्टमध्ये शॉपिंग करण्याचं स्वप्न भंग केलं. या, डी-मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे. 
- ऋषी बर्गे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com