सावधान : ऑस्ट्रेलियाची होरपळ; जागतिक तापमानवाढीची घंटा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

अल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असेलला ऑस्ट्रेलियात सध्या तळपत्या उन्हाने होरपळत आहे. तिथल्या हवमानानं आणि प्रदूषण मुक्त हवेनं अनेक पर्यटकांना भुरळ घातलीय. पण, आता ऑस्ट्रेलियातही पाऱ्यानं चाळिशी पार केलीय. या आठवड्यात सिडनी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 17 डिसेंबर रोजी देशात सरासरी 40.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

सिडनी - अल्हाददायक वातावरणासाठी प्रसिद्ध असेलला ऑस्ट्रेलियात सध्या तळपत्या उन्हाने होरपळत आहे. तिथल्या हवमानानं आणि प्रदूषण मुक्त हवेनं अनेक पर्यटकांना भुरळ घातलीय. पण, आता ऑस्ट्रेलियातही पाऱ्यानं चाळिशी पार केलीय. या आठवड्यात सिडनी येथे उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 17 डिसेंबर रोजी देशात सरासरी 40.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऑस्ट्रेलियात कडक उन्हाळा जाणवत असून, संभाव्य उष्णतेच्या लाटेमुळे आणखी कठीण परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागणार असल्याची शक्‍यता हवामान विभाग केंद्राने काल वर्तविली आहे. देशात अनेक ठिकाणी वणवा लागल्याने वातावरण खराब झालेले आहे. उष्णतेची लाट ही ऑस्ट्रेलियासाठी जागतिक तापमानवाढीचा धोक्‍याचा इशारा देणारी ठरणार असल्याची भीती हवामान शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. उन्हाळ्यात जंगलाला लागणाऱ्या आगींना यंदा लवकर सुरवात झाली असून, त्यांचे प्रमाणही मोठे होते. यावरुनच हवामान बदलाच्या समस्येवर मार्ग काढण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारवर दबाब आला आहे, असेही सांगण्यात आले. 

गुगलमध्ये नेमकं चाललंय तरी काय?

सहा वर्षांपूर्वींचा विक्रम मोडला 
ऑस्ट्रेलियात यंदा उन्हाचा कडाका वाढलेला आहे. याआधी जानेवारी 2013मध्ये तापमानाने उच्चांक गाठला होता. त्या वेळी 40.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. यंदा डिसेंबरमध्येच हा उच्चांक मोडीत निघाला असून मंगळवारी देशात सरासरी 40.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: australia experiences maximum temperature ever recorded global warming