
पांढऱ्या कबूतराच्या पायात असलेल्या निळ्या पट्ट्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारला टेन्शन आलं आहे. ऑस्ट्रेलिया सरकारला वाटतं की हे कबूतर देशात मोठा आजार पसरवू शकतं.
मेलबर्न - पांढऱ्या रंगाचे कबूतर प्रत्येकाला आवडतं. अनेक पर्यटन स्थळांवर गेलं की असे पक्षी आढळतात. त्यांना येणारे पर्यटक खायलाही टाकत असतात. मात्र ऑस्ट्रेलियात असंच एक पांढरं कबूतर जीवाला धोका निर्माण करणारं ठरत असल्याचा दावा केला जात आहे. ऑस्ट्रेलिया सरकारचे म्हणणे आहे की, एक कबूतर आल्यानं ऑस्ट्रेलियात आजार पसरू शकतो.
ऑस्ट्रेलियानं कबूरत धोकादायक असल्याचा दावा करण्याचं कारण असं आहे की, ते कबूतर अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला 13 हजार किलोमीटर अंतर पार करून आलं आहे. एपी वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात पांढरं कबूतर अमेरिकेतील ऑरेगॉन इथं कबूतरांच्या रेसमध्ये सहभागी झालं होतं. शर्यतीवेळी कबूतर वाट चुकलं होतं आणि अनेक हजार किलोमीटर अंतर पार करून ते ऑस्ट्रेलियाला पोहोचलं होतं.
कबूतराचे नाव जो असं आहे. हे कबूतर ऑस्ट्रेलियात पकडण्यात आलं होतं. त्याच्या पायात निळ्या रंगाचा पट्टा बांधण्यात आला होता. शर्यतीमध्ये ते ओळखता यावं यासाठी पायात निळ्या रंगाचा पट्टा बांधण्यात आला होता. कबूतर 26 डिसेंबरला 13 हजार किलोमीटर अंतर पार करून मेलबर्नला पोहोचलं होतं.
पांढऱ्या कबूतराच्या पायात असलेल्या निळ्या पट्ट्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारला टेन्शन आलं आहे. ऑस्ट्रेलिया सरकारला वाटतं की हे कबूतर देशात मोठा आजार पसरवू शकतं. यासाठी कबूतराला मारण्यात यावं. मात्र ऑस्ट्रेलिया सरकारच्या या निर्णयानंतर ओक्लाहोमा इथल्या अमेरिकन रेसिंग पिजन युनियनचे स्पोर्ट डेव्हलपमेंट मॅनेंजर डियोन रॉबर्टस यांनी म्हटलं की कबूतराच्या पायात बांधलेला निळा बँड नकली आहे.
डियोन रॉबर्टस यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलियात जे कबूतर सापडलं आहे ते अमेरिकेच्या निळ्या बँडच्या कबुतरापेक्षा वेगळं आहे. आम्ही शर्यतीत सहभागी असलेल्या कबुतराला ट्रेस करू शकलेलो नाही. आम्ही हे सांगू शकतो की सध्या ज्या कबूतराची चर्चा आहे ते ऑस्ट्रेलियातीलच आहे. जर हे शर्यतीतलं कबूतर असतं तर त्याच्या बँडवरून आम्ही त्याला ओळखलं असतं.
अमेरिका अमेरिका अमेरिका