चीनकडून डांबून ठेवण्याची धमकी; ऑस्ट्रेलियाच्या पत्रकाराचा आरोप

पीटीआय
Tuesday, 22 September 2020

चीनने येथील विदेशी पत्रकारांना अनेक वेळा धमक्या दिल्याचे सांगत पत्रकारांनी चीनचा चेहरा उघडा पाडला आहे. सध्या चीनशी ऑस्ट्रेलियाचे संबंधही तणावाचे झाले आहेत. 

कॅनबेरा - चीनकडून मानहानिकारक वागणूक मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या सर्व पत्रकारांना चीनमधून काही दिवसांपूर्वीच माघारी आणले. चीनने येथील विदेशी पत्रकारांना अनेक वेळा धमक्या दिल्याचे सांगत पत्रकारांनी चीनचा चेहरा उघडा पाडला आहे. सध्या चीनशी ऑस्ट्रेलियाचे संबंधही तणावाचे झाले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मॅथ्यू कार्नी हे २०१८ मध्ये चीन सोडून ऑस्ट्रेलियाला परत आले होते. त्यावेळी त्यांना आणि त्यांच्या १४ वर्षांच्या मुलीला डांबून ठेवण्याची धमकी चीन सरकारने दिली होती, असा आरोप कार्नी यांनी केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील राजनैतिक संबंध बिघडायला नको म्हणून दोन वर्षे आपण काही बोललो नव्हतो, असा खुलासाही कार्नी यांनी केला आहे. ऑस्ट्रेलियाने दोन वर्षांपूर्वी स्थानिक राजकारणात विदेशी हस्तक्षेपास विरोध करणारा कायदा मंजूर करून घेतला त्यावेळी कार्नी हे ‘एबीसी’ या वृत्तसंस्थेचे चीनमधील प्रमुख होते.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

परवानगी नाकारली
चीनकडून अशी धमकी मिळाल्यानंतर कार्नी यांनी दुसऱ्याच दिवशी कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला परतण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, चिनी अधिकाऱ्यांनी परवागनी नाकारली होती. अखेर दूतावासाने केलेल्या मध्यस्थीनंतर न केलेला गुन्हा कबूल करत कार्नी यांना ऑस्ट्रेलियातून काढता पाय घ्यावा लागला.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Australian journalist accused Threats from China