ब्रिटनहून अमेरिकेला गेलेले ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान Corona Positive

ब्रिटनहून अमेरिकेला गेलेले ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान कोरोना पॉझिटिव्ह!
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयस
ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयसesakal
Summary

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयस हे वॉशिंग्टनमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

ऑस्ट्रेलियाचे (Australia) उपपंतप्रधान (Deputy Prime Minister) बर्नाबी जॉयस (Barnaby Joyce) हे वॉशिंग्टनमध्ये (Washington) कोरोना पॉझिटिव्ह (Covid-19 Positice) आले आहेत. ते अधिकृत दौऱ्यावर येथे आले होते. मात्र, त्यांच्या उर्वरित कर्मचाऱ्यांचा कोरोना चाचणीचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. बर्नाबी जॉयस यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयस
तुमच्याकडे किती सिम आहेत? 'या'पेक्षा जास्त ठेवल्यास नंबर होणार बंद

निवेदनात म्हटले आहे, की बर्नाबी जॉयस यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर त्यांच्या कर्मचाऱ्यांचे इतर सदस्य कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत. जॉयस यांच्यामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी झाली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

बर्नाबी जॉयस हे पहिले मोठे ऑस्ट्रेलियन नेते आहेत. बर्नाबी जॉयस हे मंगळवारीच अमेरिकेच्या दौऱ्यावर आले आहेत. ते ब्रिटनमधून अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते. वॉशिंग्टनमध्ये त्यांनी अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही भेट घेतली.

ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान बर्नाबी जॉयस
दही खरेदीसाठी चक्क ड्रायव्हरने थांबवली ट्रेन! पाकिस्तानातील घटना

कोरोनाचा कहर सुरूच

कोरोनाचा कहर अजून संपलेला नाही. युरोपातील अनेक देश अजूनही कोरोनाच्या लाटेचा सामना करत आहेत. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट Omicron ने दक्षिण आफ्रिका, अमेरिका, UK, भारत आणि रशियासह जगातील 40 देशांमध्ये पोचला आहे. एकट्या ब्रिटनमध्ये ओमिक्रॉनची 300 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अलीकडेच ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी संसदेत इंग्लंडच्या अनेक भागात पसरलेल्या ओमिक्रॉनचा कम्युनिटी स्प्रेड झाल्याचे स्वीकारले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com