बार्बीसारखं दिसण्याचा हट्ट! सिलिकॉनच्या स्तनासाठी महिलेने केला लाखोंचा खर्च |Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Woman Spends Rs 53 Lakh to Turn Herself into 'Human Barbie'

बार्बीसारखं दिसण्याचा हट्ट! सिलिकॉनच्या स्तनासाठी महिलेने केला लाखोंचा खर्च

प्रत्येक स्त्रिला वाटते की तिने बार्बी डॉल सारखं दिसाव. यासाठी अनेक महिला आपल्या सौंदर्यासाठी अनेक पैसे खर्च करतात, मात्र २१ वर्षीय ऑस्ट्रेलियन मॉडेलने बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी तिच्या शरीरावर अत्यंत कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्या आहेत. ज्या सध्या सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Austrian model has done extreme cosmetic surgeries on her body to look like a Barbie doll goes viral)

सोशल मीडियावर जेसी बनी म्हणून लोकप्रिय असलेल्या जेसिकाने तिच्या या शस्त्रक्रियेनंतर तिच्या कुटुंबाने तिच्याशी संबंध तोडल्याचे सांगितले.सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे

जेसीने आतापर्यंत अंदाजे ५३ लाख रुपये खर्च केले आहेत. ऑस्ट्रेलियन प्रेसशी बोलताना जेसीने सांगितले की बार्बी डॉलसारखे दिसण्यासाठी तीने शरीरावर कॉस्मेटिक शस्त्रक्रियेवर खर्च केल्यानंतर तिचे कुटुंब तिच्याशी बोलत नाही.ते तीचे कॉल ब्लॉक करत आहेत, हे अत्यंत वाईट आहे.

जेसी 18 वर्षांची असताना तीने तिच्या शरीरावर शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून तिच्यावर तीन स्तन वाढवण्याच्या शस्त्रक्रिया झाल्या. याशिवाय तिचे नितंब आणि ओठ मोठे दिसण्यासाठी तिने कॉस्मेटिक सर्जरीही केली होती. तिने इंस्टाग्रामवर अनेक तीच्या शस्त्रक्रिया दरम्यान झालेल्या ट्रान्सफॉर्मेशनच्या फोटो शेअर केल्या आहेत.

अनेक कॉस्मेटिक शस्त्रक्रिया केल्यानंतर जेसीला आता आणखी स्वत:त परिवर्तन करायचे आहे. ती आणखी अनेक शस्त्रक्रिया करण्यास सक्षम आहे. तीला संपूर्ण देशात सर्वात मोठे ओठ हवे आहेत, असे जेसी प्रेसशी बोलताना म्हणाली.

Web Title: Austrian Model Has Done Extreme Cosmetic Surgeries On Her Body To Look Like A Barbie Doll Goes Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top