आयशा मलिक होणार पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ayesha Malik

आयशा मलिक होणार पाकिस्तानच्या पहिल्या महिला न्यायाधीश

पाकिस्तानच्या (Pakistan) सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश आयशा मलिक (Ayesha Malik) यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्चस्तरीय न्यायिक समितीने लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आयशा मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नियुक्तीस मान्यता दिली आहे. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश (First female judge) होण्याची ही पहिलीच वेळ असेल.

आयशा मलिक (Ayesha Malik) यांच्या नावाला देशाच्या न्यायिक आयोगाने मान्यता दिली आहे. संसदीय समितीकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्यांना हा दर्जा दिला जाईल. ३ जून १९६६ रोजी जन्मलेल्या आयशा मलिक यांनी कराचीच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड इकॉनॉमिक्स, कराची ग्रामर स्कूलमधून सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर पदवी प्राप्त केली. त्यानंतर कायदेशीर शिक्षणाकडे कल वाढला आणि लाहोरच्या कॉलेज ऑफ लॉमधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील हार्वर्ड स्कूल ऑफ लॉमधून एलएलएमचे (मास्टर्स ऑफ लॉ) शिक्षण घेतले. १९९८-१९९९ मध्ये त्यांची ‘लंडन एच. गॅमन फेलो’ म्हणून निवड झाली.

हेही वाचा: ‘भाजपशी स्पर्धा करू शकत नाही, निवडणूक आयोगाने पैसे द्यावे’

आयशा मलिक (Ayesha Malik) यांनी करिअरची सुरुवात कराचीतील फखरुद्दीन जी इब्राहिम अँड कंपनीसोबत केली आणि १९९७ ते २००१ अशी चार वर्षे येथे घालवली. पुढच्या दहा वर्षांत त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आणि अनेक प्रसिद्ध लॉ फर्म्सशीसोबत काम केले. २०१२ मध्ये त्यांची लाहोर उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि कायद्याच्या जगात मोठे नाव झाले.

नावाला विरोध

न्याय आणि निर्दोष निर्णयांमुळे चर्चेत राहणाऱ्या आयशा यांच्या नियुक्तीला काही न्यायाधीश आणि वकिलांनी विरोध केला आहे. त्यांनी आयशा यांची सेवाज्येष्ठता आणि पदासाठीच्या पात्रतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयशा मलिक यांच्या नियुक्तीला पाकिस्तानातील अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दिला आहे.

नवा इतिहास लिहिला जाईल

पाकिस्तानातील (Pakistan) महिलांची स्थिती जगात कोणापासूनही लपलेली नाही. आयशा मलिक (Ayesha Malik) यांच्या नियुक्तीमुळे महिलांचे हक्क बहाल करण्याच्या दिशेने नवा इतिहास लिहिला जाईल, अशी आशा पाकिस्तानी लेखिका बिना शाह यांना आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :PakistanSupreme Court
loading image
go to top