Baba Vanga : 2024 वर्षासाठी बाबा वेंगांची भीतीदायक भविष्यवाणी; जगाचा अंत कधी होणार?

एस्ट्रोफेम नुसार, बाबाने २०२४मध्ये देशवासियांच्या हस्ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच बाबा वेंगाने २०२४ मध्ये हवामाच्या संबंधित घटना आणि नैसर्गिक आपत्तीचा अंदाज वर्तवला आहे.
Baba Vanga
Baba Vangaesakal

Baba Vanga Predictions 2024 : बुल्गारिया येथील भविष्यवेत्ते बाबा वेंगांच्या भविष्यवाणीवर जगभरातील लोक विश्वास ठेवतात. बाब वेंगांनी प्रत्येक वर्षाप्रमाणे २०२४ साठी अनेक भविष्यवाणी केलेल्या आहेत. ज्या खूपच भीतीदायक आहेत. जगभरातल्या प्रसिद्ध भविष्यकारांमध्ये सहभागी असलेल्या बाबा वेंगांच्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या आहेत.

बाबा वेंगाने आपल्या मृत्यूपूर्वी जगाचा अंत होण्यापासून ते युद्ध आणि संकटांपर्यंत अनेक भविष्यवाणी केलेल्या होत्या. बाबांनी ५०७९ पर्यंत भविष्यवाणी केलेल्या आहेत. त्यांच्या सोवियत संघाचं विघटन, अमेरिकेतील दहशतवादी संघटना अल कायदाच्या ९/११ चा हल्ला यासह अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या आहेत. बुल्गारियातल्या दृष्टीहीन बाबा वेंगा १२ वर्षांचे असताना दृष्टीहीन झाले. तर १९९६मध्ये ८५व्या वर्षी बाबांचा मृत्यू झाला.

एस्ट्रोफेम नुसार, बाबाने २०२४मध्ये देशवासियांच्या हस्ते रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होईल, अशी भविष्यवाणी केली आहे. तसेच बाबा वेंगाने २०२४ मध्ये हवामाच्या संबंधित घटना आणि नैसर्गिक आपत्तीचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते पृथ्वीवर मोठा बदल घडणार आहे. असा बदल मोठा कालावधी लोटल्यानंतर होतो. पृथ्वीवर चोहोबाजूंनी मोठा विध्वंस होऊ शकतो.

Baba Vanga
Brij Bhushan Singh case: ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

सायबर हल्ले होतील

बाबा वेंगांनी सायबर हल्ल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होणार असल्याचं सांगितलं. 2024 मध्ये हॅकर्स पॉवर ग्रिड आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटला लक्ष्य करू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होईल. मागच्या काही महिन्यांत, अनेक मोठ्या कंपन्यांनी सायबर सुरक्षा उल्लंघनाची अनेक प्रकरणे उघड केली आहेत.

या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेला हादरवून सोडणारे मोठे आर्थिक संकट येण्याची शक्यता बाबांनी व्यक्त केली होती. यासाठी अनेक कारणं सांगण्यात आलेली आहेत. कर्जाची वाढती पातळी, वाढता भू-राजकीय तणाव आणि आर्थिक शक्तीचे पश्चिमेकडून पूर्वेकडे स्थलांतर, या घटनांचा समावेश आहे.

Baba Vanga
Ranbir kapoor: "राहा तिच्या आजोबांसारखीच होणार " असं नीतू यांनी म्हणताच रणबीरचे डोळे पाणावले

दहशतवादी हल्ले

बाबा वेंगा यांनी सांगून ठेवलंय की, 2024 मध्ये एक मोठा देश जैविक शस्त्रांची चाचणी किंवा हल्ला करेल. तसेच युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली होती. बाबा वेंगा यांनी जगाच्या अंताची भविष्यवाणी केली. त्यांनी मृत्यूपूर्वी ५०७९ वर्षापर्यंत भाकीत केले. त्यांच्या भाकितानुसार ५०७९ मध्ये जगाचा अंत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com