esakal | आई-बाप रात्रभर मोबाईलवर खेळत होते गेम, बेडवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

child hand

आई-बाप रात्रभर मोबाईलवर खेळत होते गेम, बेडवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हल्ली मोबाईलाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोबईलशिवाय करमत नाही. मोबाईलवर गेम खेळणं तर त्यापेक्षाही आधिक धोकादायक होत चाललेय. यामुळे अनेक दुर्घटना होत चालल्या आहेत. स्मार्टफोन असणे ही चैनीची बाब नसून काळाची गरज बनत चालली आहे. पण या स्मार्टफोनचा वापर गरजेपुरताच होतो असे नाही, अनेकदा आपण ऑफिसमधून घरी जाताना, बाजारात खरेदी करताना, अगदी रस्ता ओलांडतानाही हातातल्या फोनमध्ये व्यस्त असतो. काही जण तर चहा पिताना किंवा जेवतानाही सतत फोनवर असतात. विशेष म्हणजे दिवसभर आपण कितीही दमलो असू तरीही आपण दर दोन मिनीटाला फोन चेक करायला विसरत नाही. मोबाईलवर गेम खेळण्यात अनेकजण खूप व्यस्त होतात. त्यामुळे स्वत:सोबत कुटुंबाकडे लक्षही देता येत नाही. अशात अनेक दुर्घटना घडलेल्या आहेत. अशीच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टीव्ही पाहत मोबाईलवर गेम खेळण्यात एक दाम्पत्य इतकं व्यस्त होतं की बेडवरुन पडून चिमुकलीचा मृत्यू झाल्याचेही त्यांना समजलं नाही. हे दाम्पत्य रात्रभर मोबाईलवर गेम खेळत होते. पण पोटच्या मुलीचा बेडवरुन पडून मृत्यू झाल्याचं त्यांना समजले नाही. ज्यावेळी ते दुपारी बाहेर जाण्यासाठी निघाले तेव्हा त्यांना मुलगी मृत अवस्थेत आढळून आली. चार वर्षापूर्वी हे प्रकरण घडलं होतं. कोर्टानं याप्रकरणी मुलाच्या वडिलांना दोषी ठरवलं असून आईची निर्दोष मुक्तता केली आहे.

स्कॉटलँडमधील लनार्कशायर शहरात चार वर्षांपूर्वी 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. आई-वडिलांच्या निष्काळजीपणामुळे 19 महिन्याच्या मुलीचा बेडवरुन पडून मृत्यू झाला होता. मुलीचे आई-बाप टीव्ही पाहत मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होते. संपूर्ण रात्र हे दाम्पत्य टिव्ही पाहत मोबाईलवर गेम खेळण्यात व्यस्त होते. त्यांना चिमुकलीच्या रडण्याचाही आवाजही आला नाही. दाम्पत्य रात्रभर गेम खेळत होते. त्यानंतर सकाळी सहा वाजता ते झोपले. दुपारी उठून बाहेर जाण्यासाठी निघाल्यानंतर त्यांना मुलगी मृत आवस्थेत आढळली. मृत पावलेल्या 19 महिन्याच्या चिमुकलीचं नाव कीरा कॉनरॉय असं आहे.

एयरड्री शेरिफ कोर्टाने 27 वर्षीय वडील मायकल कॉनरॉय यांना या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. तर 24 वर्षीय आई किर्स्टी बॉयल हिने स्वत:ला दोषी न ठरवण्याची कोर्टाकडे विनंती केली होती. कोर्टाने ही विनंती मान्य करत तिची निर्दोष मुक्तता केली. मुलीच्या वडिलांनी आपला गुन्हा मान्य केलाय. मायकल कॉनरॉय याने कोर्टात जबाब दिला की, 'मी जाणीवपुर्वक मुलीला त्रास होईल अशा गोष्टी करत होतो. मुलाला त्रास व्हावा अथवा जखम व्हावी यासाठी नेहमी प्रयत्न करत होतो.' त्यानंतर कोर्टाने मायकल कॉनरॉय याला दोषी ठरवलं.

loading image
go to top