esakal | आश्चर्यकारक! शार्कच्या पिलाच्या चेहऱ्याचं माणसाच्या चेहऱ्याशी साम्य
sakal

बोलून बातमी शोधा

baby shark mutant fish is born with a human face

या पिलाला पाहिल्यानंतर तुमची नजर हटणार नाही. मनुष्याच्या चेहऱ्यासह जन्म घेतलेल्या या शार्कच्या पिलामध्ये जनुकीय बदल घडून आला आहे.

आश्चर्यकारक! शार्कच्या पिलाच्या चेहऱ्याचं माणसाच्या चेहऱ्याशी साम्य

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

विशाल समुद्र किंवा महासागराची एक वेगळीच भन्नाट दुनिया आहे. या दुनियेत अनेक आश्चर्यकारक गोष्टी आणि जीव पहायला मिळतात. अशीच एक विचित्र पण आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. ही घटना म्हणजे एका विशालकाय शार्क माशाच्या पिलानं मनुष्याच्या चेहऱ्यासह जन्म घेतला आहे. या पिलाला पाहिल्यानंतर तुमची नजर हटणार नाही. मनुष्याच्या चेहऱ्यासह जन्म घेतलेल्या या शार्कच्या पिलामध्ये जनुकीय बदल घडून आला आहे.


इंडोनेशियातील ४८ वर्षीय मच्छिमार अब्दुल्ला नुरेन यांना पूर्व नुसा तेंगरा प्रांतात शार्कचं हे पिल्लू आढळून आलं. सुरुवातीला अब्दुल्ला यांच्या मासे पकडण्याच्या जाळ्यात प्रौढ शार्क मासा अडकला होता. हा मासा जाळ्याबाहेर काढून त्याचं पोट फाडण्यात आलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण या शार्कच्या पोटात तीन छोटी पिल्लं आढळून आली. या तीन पिलांपैकी एका पिलाच्या चेहऱ्याची ठेवण ही हुबेहुब मनुष्यासारखी होती. या पिलाला नाकाखाली दोन मोठे डोळे असून त्याखाली माणसाच्या तोंडाप्रमाण तोंड आणि त्यात जीभ आहे. 


या घटनेबाबत सांगताना अब्दुल्ला नुरेन म्हणाले, "सुरुवातीला माझ्या जाळ्यात आई शार्क मासा सापडला. दुसऱ्या दिवशी मी या शार्क माशाचं पोट कापलं तर मला त्यात तीन पिल्लं आढळून आली. यांपैकी दोन  पिल्लं ही त्यांच्या आईसारखी सर्वसाधारण शार्क माशाप्रमाणं दिसत होती. मात्र, तिसरं पिल्लाचा चेहरा माणसाप्रमाणं होता." 


या आश्चर्यकारक घटनेनंतर नुरेन यांनी हे विशेष पिल्लू जतन करण्यासाठी आपल्या घरी नेलं.  नुरेन यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना हे पिल्लू विकत घेण्याची ऑफरही दिली. मात्र, त्यांनी हे पिल्लू दुसऱ्याला देण्यास नकार दिला.


"असा विशेष शार्क मासा सापडल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर लोकांनी माझ्या घरी हा मासा पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेक लोकांनी हा मासा विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र मी त्याला नकार दिला कारण मला त्याचे जतन करायचे होते. मला वाटतं शार्क माशाचं हे पिल्लू माझ्यासाठी गुडलक घेऊन आलं आहे," असं मच्छिमार अब्दुल नुरेन यांनी म्हटलं आहे. 

social media सोशल मीडिया

loading image