जगात सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले बहारिनचे शेख खलिफा यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 November 2020

बहारिनचे पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे बुधवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. रॉयल कोर्ट ऑफ बहारिनने पंतप्रधानांचे निधन झाल्याचं जाहीर केलं. 

मनामा - बहारिनचे पंतप्रधान खलिफा बिन सलमान अल खलिफा यांचे बुधवारी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले. रॉयल कोर्ट ऑफ बहारिनने पंतप्रधानांचे निधन झाल्याचं जाहीर केलं. अमेरिकेतील के मायो क्लिनिकल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती बहरिनमधील स्टेट न्यूज एजन्सीने म्हटलं आहे. 

शेख खलिफा यांचे पार्थिव मायदेशी आणले जाणार असून बहारिनमध्ये अंत्यसंस्कार होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अंत्यसंस्कारासाठी मोजक्याच लोकांना उपस्थित राहता येणार आहे. यामध्ये जवळच्या नातेवाईकांचा समावेश असेल. 

शेख खलिफा यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1935 ला बहारिच्या राजे कुटुंबात झाला होता. त्यांनी 1970 पासून बहारिनच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सांभाळली होती. 15 ऑगस्ट 1971 ला बहारिच्या स्वातंत्र्याच्या एक वर्ष आधीच त्यांनी पदाची शपथ घेतली होती. शेख खलिफा हे जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणारे व्यक्ती होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: baharain pm shaikh khalifa dies at 84 long serving pm

Tags
टॉपिकस
Topic Tags: