Balochistan Freedom : 'बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र', बलुच बंडखोरांची घोषणा
Balochistan’s independence from Pakistan : बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाल्याची घोषणा बलुच नेते मीर यार बलुच यांनी केली. मानवाधिकार उल्लंघन आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली आहे.
क्वेटा : ‘बलुचिस्तान पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला आहे,’ अशी घोषणा बलुचिस्तान स्वातंत्र्य चळवळीचे प्रतिनिधी मीर यार बलुच यांनी बुधवारी केली. त्याचबरोबर बलुच नागरिकांना पाकिस्तानची जनता असे संबोधू नये, असे आवाहनही त्यांनी भारतीय माध्यमांना केले.