
ना हसू, ना आनंद, दारु प्यायल्यास मृत्यूदंड! उत्तर कोरियात अजब कायदा
प्योंग यांग : उत्तर कोरिया(North Korea) आपल्या विचित्र नियम आणि निर्णायांसाठी प्रसिद्द आहे. आता येथील हुकुमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने लोकांच्या हसण्यावर बॅन लावला आहे. उत्तर कोरियामध्ये सध्या पूर्वीचे नेते किम जोंग इल (former Supreme Leader Kim Jong Il)यांच्या १० वे श्राद्ध आहे. त्यासाठी पुढील ११ दिवसांसाठी उत्तर कोरियातील नागरिकांना शोक व्यक्त करावा लागणार आहे. या काळात जर कोणीही आनंदी होऊ शकत नाही, ना कोणी हसू शकत नाही.
जनतेच्या हसण्यावरच बॅन लावला आहे. उत्तर कोरियामध्ये आपला पूर्व नेता किम जोंग ईलचे १० वे श्राध्द केले जात आहे त्यासाठी ११ दिवस उत्तर कोरियातील लोकांना शोक व्यक्त करावे लागणार आहे. या काळात कोणी आनंदी असू शकत नाही, ना हसू शकतात. जर कोणी दारू पिताना सापडले तर थेट मृत्यूची शिक्षा देण्यात आली आहे.
हेही वाचा: Miss World 2021 Postponed! भारताच्या 'मानसा'सह अनेकांना ओमिक्रॉनची बाधा
डेलीमेलच्या वृत्तानुसार, किम जोंग इलने उत्तर कोरियाने १९९४ ते २०११ पर्यंत राज्य केले आहे. कोरियाचा क्रुर शासक किम जोंग इलचा मृत्यू १७ डिसेंबर २०११ ला वयाच्या ६९ व्या वर्षी हार्ट अॅटकमुळे झाला होता. इल नंतर त्याचा तीसरा सर्वात छोटा मुलगा किम जोंग उन याने देशाचा कारभार संभाळला आहे. आता इलच्या मृत्यूला १० वर्ष पूर्ण झाल्यावर उत्तर कोरियाच्या नागरिकांना ११ दिवासांच्या कडक शोक व्यक्त करण्याचा आदेश दिला आहे.
१७ डिसेंबरला कोणीही नवीन सामान खेरदी करत नाही
किम जोंग इलच्या मृत्यू १७ डिसेंबरलला झाली होती त्यामुळे लोकांना सक्तीचा आदेश आहे की, या दिवशी कोणीही बाजारातून कोणतीही नवीन वस्तू खरेदी नाही करू शकत. कोणीही नवीन डिश बनविणार नाही. जे लोक शोक व्यक्त करण्याच्या काळात दारू पीत आहेत किंवा आनंदी राहताना दिसतील त्यांना ताबडतोब अटक केले जाईल आणि वैचारिक गुन्हेगार म्हणून शिक्षा होईल.
हेही वाचा: भारतात मुलींच्या लग्नाचं वय 21 होतंय, इतर देशांमध्ये कायदेशीर वयोमर्यादा 12
११ व्या दिवसानंतर करु शकतात अंतिम संस्कार
जर ११ दिवसांच्या काळात कोणत्याही कुटुंबातील नागरिकांचा मृत्यू होत असेल तर कोणालाही रडण्याची परवानगी नाही. तसेच मृतदेहावर अतिंम संस्कार देखील ११ दिवसांनतरच होऊ शकतात.
लोक दुखी आहेत की नाही यावर पोलिस अधिकाऱ्यांना येथे लोकांवर कडक नजर ठेवण्यास सांगितले आहे.
Web Title: Ban On Laughing In North Korea For 11 Day On Kim Jong Il 10 Th Death Anniversary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..