बांगलादेशात 9 वर्षात हिंदूंची 3700 हून अधिक घरं, मंदिरांची तोडफोड

Bangladesh
Bangladeshesakal
Summary

बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अलीकडच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर हल्ले होताना दिसत आहेत.

Bangladesh Attack On Hindus : बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर (Bangladesh Minorties Attacked) अलीकडच्या काही काळात मोठ्या प्रमाणावर हल्ले होताना दिसत आहेत. एका धार्मिक संघटनेनं याबाबतचा मोठा खुलासा केलाय. त्यांनी म्हटलंय, की गेल्या नऊ वर्षांत हिंदूंची 3721 घरं आणि मंदिरांची तोडफोड करण्यात आलीय. नागरी हक्क समूह एन ओ सलीश केंद्रानं (Ain o Salish Kendra) हा अहवाल दिलाय. ढाका ट्रिब्यूननं म्हंटलंय, की आपण गेल्या पाच वर्षांबद्दल बोललो, तर 2021 हे बांगलादेशातील हिंदूंसाठी सर्वात भयंकर होतं. कारण, काही दिवसांत हिंदू मंदिरं आणि दुर्गापूजा (durga puja) पंडालोवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत.

अहवालानुसार, या काळात हिंदू मंदिरे, मूर्ती आणि प्रार्थनास्थळांवरील हल्ल्याची 1678 प्रकरणं नोंदवली गेलीयत. याशिवाय गेल्या तीन वर्षात 18 हिंदू कुटुंबांनाही लक्ष्य केलं गेलंय. नागरी हक्क समूहानं म्हटलंय, की ही खूपच भयावह आकडेवारी आहे. मात्र, प्रत्यक्षात याची संख्या अधिक आहे. बहुतेक किरकोळ प्रकरणांना मीडिया कव्हरेज मिळत नाही आणि तक्रारी देखील दाखल केल्या जात नाहीत, असं त्यांनी सांगितलंय. हिंदूंसाठी 2014 हे सर्वात वाईट वर्ष होतं, जेव्हा अल्पसंख्याक समुदायाच्या 1201 घरांवर हल्ला करण्यात आला होता. या घरांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याच्या घटनाही घडल्या. ढाका ट्रिब्यूननुसार, या वर्षी आतापर्यंत 196 घरं, व्यापारी प्रतिष्ठानं, मंदिरं, बौद्ध मंदिरं आणि मूर्तींचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

Bangladesh
हिंदू मंदिरांवर दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांना मी सोडणार नाही

दुर्गा पूजेच्या ठिकाणी पवित्र 'कुराण ग्रंथ' ठेवल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बांगलादेशमध्ये अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार उसळला. त्यानंतर दुर्गा पूजा पंडालोमध्ये Durga Puja Pandalo (मंदिर) तोडफोडीच्या अनेक घटना घडल्या. बांगलादेशच्या हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन एकता परिषदेनं दावा केलाय, की या हल्ल्यांत सुमारे 70 लोक जखमी झालेत, तर 130 दुकानं, घरं, मंदिरांचं नुकसान झालंय. चांदपूरमधील चित्तेगांव, बंदरबन, गाजीपूर, मौलवी बाजार, हाजीगंज, चटगांवमधील बांसखली आणि कॉक्स बाजारातील पेकुआ येथे हिंदू मंदिरांचं नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या हल्ल्यात नोआखाली जिल्ह्यातील बेगमगंजमधील जतन कुमार सिन्हा नावाची व्यक्ती ठार झालीय.

Bangladesh
बांगलादेशात दुर्गा पूजेदरम्यान हिंदू मंदिरावर हल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com