बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले I Hindu Temple | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ISKCON Radhakanta Temple in Bangladesh

बांगलादेशात पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना समोर आलीय.

बांगलादेशात हिंदू मंदिरावर पुन्हा हल्ला; 9 वर्षांत तब्बल 3600 हून अधिक हल्ले

बांगलादेशमध्ये (Bangladesh) पुन्हा एकदा हिंदू मंदिरावर (Hindu Temple) हल्ला झाल्याची घटना समोर आलीय. बांगलादेशची राजधानी ढाका येथील ISKCON राधाकांता मंदिरावर गुरुवारी सायंकाळी जमावानं जोरदार हल्ला केलाय. या हल्ल्यात मंदिराची तोडफोड करण्यात आली असून जमावानं इथं ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही लुटल्या आहेत. तसंच हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचंही वृत्त आहे.

ढाकामधील वारीत 222 लाल मोहन साहा स्ट्रीट इथं असलेल्या इस्कॉन राधाकांता मंदिरात (ISKCON Radhakanta Temple) सायंकाळी 7 वाजता हा हल्ला झाला असल्याचं सांगण्यात येतंय. हाजी सैफुल्लाह (Haji Saifullah) यांच्या नेतृत्वाखाली 200 हून अधिक लोकांच्या जमावानं हा हल्ला केलाय. या हल्ल्यात सुमंत्रा चंद्र श्रवण, निहार हल्दार, राजीव भद्र यांच्यासह अनेक जण जखमी झाले आहेत. बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. याआधी गेल्या वर्षी नवरात्रीला (Navratri Festival) हिंदूंविरोधात अफवा पसरवून दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले होते. एवढंच नाही, तर हिंदूंच्या घरांवरही हल्ले करण्यात आले होते.

हेही वाचा: 'चित्रपटात खोटी कहाणी, 'द कश्मीर फाइल्स' Tax Free करणार नाही'

बांगलादेशात 9 वर्षांत हिंदूंवर 3600 हून अधिक हल्ले

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांवर काम करणाऱ्या AKS या संस्थेच्या म्हणण्यानुसार, गेल्या 9 वर्षांत बांगलादेशातील अल्पसंख्याकांना 3,679 हल्ल्यांना सामोरं जावं लागलंय. यादरम्यान धार्मिक स्थळांची तोडफोड आणि सशस्त्र हल्ल्याची 1678 प्रकरणं समोर आली आहेत. याशिवाय, हिंदू समाजाला लक्ष्य करून घरांची तोडफोड, जाळपोळ यासह वारंवार हल्ले होत आहेत.

Web Title: Bangladesh Dhaka Iskcon Radhakanta Hindu Temple Attacked And Vandalised

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..