बांगलादेशात महिला पत्रकाराची निर्घृण हत्या

वृत्तसंस्था
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

ढाका : बांगलादेशात अज्ञात हल्लेखोरांनी एका वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आज (बुधवार) उघडकीस आली. सुवर्णा नोदी (वय 32) असे मृत महिलेचे नाव असून तिची राहत्या घरी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

खासगी वृत्तवाहिनी आनंद टीव्हीची ती पत्रकार होती. याशिवाय सुवर्णा या डेली जाग्रतो बांगला समाचार आणि बीडी न्यूज 24 डॉटकॉमसाठी देखील काम करत होत्या. ढाक्‍यापासून सुमारे दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या पबना जिल्ह्यात राधानगर भागात त्या राहत होत्या. सुवर्णा यांना नऊ वर्षांची एक मुलगी आहे. तसेच पतीपासून घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू होती. काल रात्री दहा ते बारा हल्लेखोर मोटारसायकलवरून तिच्या घरी आले आणि पावणे अकराच्या सुमारास त्यांनी दारावरची बेल वाजवली. तिने दरवाजा उघडताच हल्लेखोरांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राने तिची हत्या करून त्यांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत तिला दवाखान्यात नेले असता डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले.

Web Title: Bangladesh female journalist hacked to death