
ढाका : ‘इस्कॉन’ म्हणजे धार्मिक कट्टरतावादी गट असल्याचा आरोप बांगलादेश सरकारने येथील उच्च न्यायालयात केला आहे. तसेच, आम्ही ‘इस्कॉन’चा आढावा घेत आहोत, असेही सरकारने न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. हिंदूंचे धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना दोन दिवसांपूर्वी झालेल्या अटकेनंतर ढाक्यामध्ये हिंदूंनी आक्रमकपणे आंदोलन सुरू केले आहे.