
ढाका : बांगलादेशमध्ये सत्तांतर होताच हंगामी सरकारने अभ्यासक्रम बदलण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या नव्या अभ्यासक्रमात अनेक ऐतिहासिक घटनाच पुसून टाकण्यात आल्या असून त्याऐवजी वेगळ्या, सध्याच्या सरकारच्या सोयीच्या घटनांचा भरणा करण्यात आला असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.