
ढाका : ‘इस्कॉन’ ही कट्टरतावादी संघटना असल्याने तिच्यावर बांगलादेशमध्ये बंदी आणावी, अशी येथील सरकारने केलेली मागणी उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. बांगलादेशमधील हिंदू नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आजच्या निर्णयाद्वारे येथील अल्पसंख्य हिंदू समुदायाला दिलासा दिल्याचे मानले जात आहे.