esakal | फ्रान्सचे नागरिकांना आवाहन-सावध राहा
sakal

बोलून बातमी शोधा

ढाका - फ्रान्सच्या विरोधात सोमवारी इस्लामी आंदोलन बांगलादेश या राजकीय पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (एएफपी)

प्रेषित महंमद यांच्या व्यंगचित्रांचा वाद आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे अनेक मुस्लीम तसेच अरब देश संतापले असून तेथील विरोध तीव्र झाला. फ्रेंच मालावर यापूर्वीच बहिष्कार टाकण्यात आला आहे.

फ्रान्सचे नागरिकांना आवाहन-सावध राहा

sakal_logo
By
यूएनआय

पॅरिस - मुस्लीमबहुल देशांत प्रवास करणाऱ्या आपल्या नागरिकांनी जास्त सावधगिरी बाळगावी आणि सुरक्षेची अतिरिक्त काळजी घ्यावी असे आवाहन फ्रान्सने केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रेषित महंमद यांच्या व्यंगचित्रांचा वाद आणि अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इतिहासाचे शिक्षक सॅम्युएल पॅटी यांना श्रद्धांजली वाहिल्यामुळे अनेक मुस्लीम तसेच अरब देश संतापले असून तेथील विरोध तीव्र झाला. फ्रेंच मालावर यापूर्वीच बहिष्कार टाकण्यात आला आहे.

सोमवारी रात्री तुर्कस्तानमधील अंकारा येथील फ्रेंच वकीलातीने इशारा जारी केला. निदर्शनांचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय संदर्भ लक्षात घेता सार्वजनिक ठिकाणी होणारी कोणतीही निदर्शने किंवा सभा टाळाव्यात असेही सांगण्यात आले.

मंगळवारी फ्रेंच परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून नवा सुरक्षा सल्ला जारी केला. त्यानुसार इंडोनेशिया, बांगलादेश, इराक आणि मॉरीटेनिया या देशांतील नागरिकांनी अतिरिक्त खबरदारी घ्यावी. पर्यटक किंवा स्थलांतरित समुदायाची गर्दी होणाऱ्या ठिकाणी दक्ष राहावे अशी सूचना देण्यात आली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फेसबुकला खडसावतानाच मॅक्रॉन यांच्यावरही टीका केली. त्यानंतर अरब आणि मुस्लीम जगतामधील विविध देशांनी फ्रान्सचा  निषेध केला आहे.

मुद्दा उपहास आणि स्वातंत्र्याचा
फ्रान्समध्ये धार्मिक उपहास हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेतील भाष्य मानले जाते. दुसरीकडे प्रेषित महंमद यांच्यावरील टीका मुस्लीमांच्यादृष्टिने गंभीर गुन्हा ठरतो.

इराणमध्ये राजदूतास पाचारण
तेहरान - इराणने सोमवारी फ्रेंच राजदूतास पाचारण केले आणि त्यांच्याकडे तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला. मंगळवारी सरकारी दूरचित्रवाणी संस्थेने हे वृत्त दिले. कोणत्याही पदावरील व्यक्तीकडून इस्लामच्या शुद्ध तत्त्वांचा अनादर सहन केला जाणार नाही, असे बजावण्यात आले.

सौदी अरेबियाकडून निषेध
रियाध - सौदी अरेबियाकडून फ्रान्सचा निषेध करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, इस्लामचा दहशतवादाशी संबंध जोडण्याचा कोणताही प्रयत्न आम्हाला अमान्य आहे. प्रेषित महंमद यांच्या अवमानकारक व्यंगचित्रांचा आम्ही निषेध करतो. बौद्धिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य हे आदर, सहिष्णुता आणि शांतीसाठी दिपस्तंभ असले पाहिजे. द्वेष, हिंसा आणि अतिरेकवाद त्याद्वारे फेटाळला जातो.

फ्रान्सचा विरोध
अनेक अरब व्यापारी संघटनांचे फ्रेंच मालावर बहिष्काराचे आवाहन
बगदाद, तुर्कस्तान, गाझा पट्टी येथे फ्रेंच ध्वज तसेच फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पोस्टर जाळली. सौदी अरेबियात कॅर्रेफोर या फ्रेंच सुपरमार्केट साखळीवर बहिष्काराचे आवाहन, या कंपनीच्या फ्रेंच प्रतिनिधीनुसार अद्याप परिणाम जाणवलेला नाही

Edited By - Prashant Patil

loading image
go to top