Bhagavad Gita : युरोपियन फिलॉसॉफरने ओकली 'भगवद्गीते'विरुद्ध गरळ! हिटलरच्या नाझी जर्मनीशी जोडले नाते; पाहा व्हिडिओ

Slavoj Zizek Controversy : स्लावोज यांनी यावेळी ओपनहायमर चित्रपटाचा देखील उल्लेख केला.
Bhagavad Gita
Bhagavad GitaeSakal

Slavoj Zizek Video : प्रसिद्ध स्लोवेनियन कम्युनिस्ट फिलॉसॉफर स्लावोज झिझेक हे सध्या चर्चेत आले आहेत. याला कारण म्हणजे त्यांनी भगवद्गीतेबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. 'इयर ऑफ दि क्रॅकेन' या एक्स हँडलवरुन झिझेक यांचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

झिझेक यांनी भगवद्गीतेला "जगातील सर्वात अश्लील आणि घृणास्पद धार्मिक पुस्तकांपैकी एक" म्हटलं आहे. सोबतच, कुप्रसिद्ध नाझी अधिकारी हेनरिक हिमलर याने ज्यूंचा नरसंहार बरोबर ठरवण्याठी भगवद्गीतेचा वापर केल्याचंही झिझेक म्हणाले.

ओपनहायमरचा उल्लेख

स्लावोज यांनी यावेळी ओपनहायमर चित्रपटाचा देखील उल्लेख केला. या चित्रपटातील एका इंटिमेट सीनमध्ये कलाकारांच्या बाजूला भगवद्गीतेची एक प्रत दाखवली आहे. "या सीनमुळे भारतात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. घाणेरडी अश्लील कृती करताना बाजूला भगवद्गीता दाखवल्यामुळे भारतीयांनी नाराजी व्यक्त केली होती. मी त्यांच्याशी सहमत आहे, मात्र अगदी उलट अर्थाने. प्रेमसंबंधांसारखी सुंदर कृती करतानाचा क्षण ते मध्येच हे घाणेरडं पवित्र पुस्तक वाचून वाया घालवतात." (Global News)

Bhagavad Gita
Israel Army in Gaza City : "हमासला संपवूनच मागे फिरणार"; गाझा शहरापर्यंत पोहोचलं इस्राइलचं सैन्य

नाझी कनेक्शन

झिझेक यांनी असंही म्हटलं आहे, की "कुप्रसिद्ध नाझी अधिकारी हेनरिक हिमलर हे कायम आपल्यासोबत गीतेची एक प्रत ठेवत होते. जेव्हा हिमलर यांना विचारलं जात की आपण अगदी भयानक कृत्य करत आहोत, आपण महिलांना आणि लहान मुलांना मारत आहोत.. आपण मानव असून असं कसं करू शकतो? त्यावर त्यांचं उत्तर एकच होतं - भगवद्गीता"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com