
वॉशिंग्टन - ‘बिहार हा देश असता तर लोकसंख्येच्या प्रमाणानुसार तो जगातील ११ वा मोठा देश ठरला असता. बिहारने याबाबतीत नुकतेच जपानला मागे टाकले आहे. मात्र, बिहार हे एक अपयशी राज्य असून आपल्याला गाळात रुतलेल्या या राज्याला बाहेर काढायचे आहे आणि यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागणार आहेत,’ असे जनसुराज पक्षाचे नेते प्रशांत किशोर यांनी आज बिहारी समुदायाशी बोलताना सांगितले. बिहारमध्ये पुढील वर्षी होणारी विधानसभा निवडणूक जनसुराज पक्ष नक्की जिंकेल, असा विश्वास किशोर यांनी व्यक्त केला.