'ब्लाह, ब्लाह, ब्लाह...' ग्लासगोच्या पर्यावरण परिषदेवर का भडकली ग्रेटा? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

greta thunberg.jpg

'ब्लाह, ब्लाह, ब्लाह...' ग्लासगोच्या पर्यावरण परिषदेतील चर्चा ग्रेटाने का ठरवली बाष्कळ?

ग्रेटा थनबर्ग (Environmental campaigner Greta Thunberg) ही आपल्या पर्यावरण चळवळीसाठी ओळखली जाते. सध्याचे सत्ताधारी चुकीच्या दिशेचा विकास करत असून पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याच आरोप तिने सातत्याने केला आहे. 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर' नावाने चळवळ करणारी ग्रेटा अनेक कारणांनी चर्चेत असते. ग्लास्गो येथे संयुक्त राष्ट्राची हवामानबदल आणि त्यांचे गंभीर परिणाम या गंभीर प्रश्‍नावर परिषद झाली. ३१ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या परिषदेत १२० देशांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी सहभागी झाले होते. संयुक्त राष्ट्रांनी आयोजित केलेल्या या २६ व्या हवामान बदल परिषदेच्या (सीओपी-२६) (COP26 climate summit) चर्चेत ठरलेल्या जागतिक कराराला “ब्ला, ब्ला, ब्ला..” असं म्हणत नाकारलं आहे.

हेही वाचा: ग्लास्गो परिषदेतील ‘आतषबाजी’

पॅरिस करारानुसार देशामधील कार्बन उत्सर्जन वेगाने कमी करण्याचा विचार जगभरातील नेत्यांनी करणे, कार्बन उत्सर्जन कमी करण्याबाबतच्या योजनेचा आढावा पाच वर्षांतून एकदा घेणे, जे श्रीमंत देश पर्यावरण अधिक दूषित करीत आहेत, त्यांनी हवामान बदलांना सामोरे जाणाऱ्या गरीब देशांना निधी देणे आणि ‘नेट-झिरो किंवा कार्बन तटस्थता प्रस्थापित करण्याच्या विषयावर या परिषदेत चर्चा झाली. मात्र, ही चर्चा म्हणजे निव्वळ गप्पा असल्याचं ग्रेटानं म्हटलंय.

ग्रेटाने म्हटलंय की खरं काम या सभागृहांच्या बाहेर चालू राहिले असून तिच्यासारखे कार्यकर्ते कधीही हार मानणार नाहीत. तिने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटलंय की, COP26 परिषद संपलेली आहे. मी या परिषदेचा काही सारांश सांगते. ब्लाह... ब्लाह... ब्लाह... मात्र, खरं काम या सभागृहांच्या बाहेर चालू राहिले असून तिच्यासारखे कार्यकर्ते कधीही हार मानणार नाहीत, असं तिने म्हटलंय. थोडक्यात, या परिषदेत झालेल्या चर्चेला तिने बाष्कळ चर्चा ठरवली आहे. या परिषदेतील ठराव आणि प्रत्यक्षातील काम यामध्ये तफावत असून खरे काम तिच्यासारखे पर्यावरण कार्यकर्ते करत असल्याचा दावा तिने केला आहे.

हेही वाचा: आभाळाएवढं व्यक्तिमत्त्व पंडित नेहरु; पाहा दुर्मिळ फोटो...

तिने आपली एक जुनी पोस्ट रिट्वीट करत म्हटलंय की, हवामान कृतीच्या (क्लायमेट ऍक्शन) मार्गात याप्रकारे 'तडजोड' करत राहणं म्हणजे सारं काही गमावण्यासारखंच आहे. “जोपर्यंत आपण स्त्रोतावर तात्काळ, कठोर, वार्षिक उत्सर्जन कमी करत नाही तोवर आपण अपयशीच ठरत आहोत. पुढे तिने म्हटलंय की, “योग्य दिशेने लहान पावले टाकणे, “काही प्रगती करत आहोत” किंवा “हळूहळू जिंकणे” असं म्हणत राहणं म्हणजे एकप्रकारे हारण्यासारखंच आहे.

loading image
go to top