बलुचिस्तानमध्ये स्फोट; 52 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 13 नोव्हेंबर 2016

क्वेट्टा (बलुचिस्तान) - बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नुरानी दर्ग्याबाहेर शनिवारी शक्तीशाली स्फोट घडवून आणल्याचा दावा केला असून या स्फोटात किमान 52 जण ठार झाले असून 100 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत.

दक्षिण क्वेटापासून 750 किलोमीटर अंतरावर असलेल्या शाह नुरानी दर्ग्यात शनिवारी सुफी नृत्याचा कार्यक्रम सुरु होता. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. "या हल्ल्यात 52 जण ठार तर इतर 105 जण जखमी झाले आहेत', अशी माहिती बलुचिस्तानचे गृहमंत्री सरफराज बुगती यांनी दिली. मृतांमध्ये महिला आणि बालकांचाही समावेश असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. ज्या दर्ग्यात स्फोट झाला तेथे कराचीसह अन्य भागातून हजारो भाविक येतात. बचावकार्य सुरु असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जण अद्यापही स्फोटाच्या ठिकाणी अडकून पडल्याचेही बुटी यांनी सांगितले.

Web Title: Blast in Baloochistan