काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलं, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी | Kabul | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kabul Blast

काबूल पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरलं, इस्लामिक स्टेटने घेतली जबाबदारी

काबूल: अफगाणिस्तानची (Afganistan) राजधानी काबूल (Kabul) पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने (Blast) हादरली. एका मिनीबसमध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आला. या स्फोटात दोन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. दाश्त-इ-बारचीमध्ये (Dasht-e-Barchi) झालेल्या या स्फोटात वाहन पूर्णपणे नष्ट झालं आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी एएफपीला ही माहिती दिली.

दाश्त-इ-बारचीमध्ये 'हजारा शिते' हा अल्पसंख्यांक समुदाय मोठ्या संख्येने राहतो. आमच्याकडे जी प्राथमिक माहिती आहे, त्यानुसार बॉम्ब मिनीबसमध्येच होता. आम्ही तपास सुरु केला आहे, असे तालिबानने सांगितले. बॉम्ब स्फोट झाला त्यावेळी एएफपीचा कर्मचारी तिथेच जवळ उपस्थित होता.

हेही वाचा: एअर इंडियाच्या विक्रीनंतर केंद सरकार करणार 'या' पाच कंपन्यांची निर्गुंतवणूक

"मी मोठा आवाजा ऐकला. मी तिथे जाऊन पाहिलं, त्यावेळी मिनीबस आणि टॅक्सी जळत होती. रुग्णवाहिकेतून जखमी आणि मृतांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत होते" असे एएफपीच्या कर्मचाऱ्याने सांगितले. इस्लामिक स्टेट खोरासनने या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. दोन वेगवेगळे स्फोट घडवून आणल्याचा दावा इस्लामिक स्टेट खोरासनने त्यांच्या टेलिग्राम चॅनलवरुन केला आहे.

हेही वाचा: नेपाळने सीमावाद उकरुन काढला, भारतातल्या तीन गावांवर सांगितला हक्क

मागच्या आठवड्यात याच भागात असाच एक मिनीबसमध्ये स्फोट झाला होता. ज्यात एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता, चार जण जखमी झाले होते. इस्लामिक स्टेट खोरासननेच या स्फोटाची जबाबदारी घेतली होती. ऑगस्टच्या मध्यावर तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवलं. पण त्यानंतरही तिथे दहशतवादी हल्ले थांबलेले नाहीत.

loading image
go to top