Turkey News : तुर्कीमध्ये दहशतवादी हल्ला; एका दहशतवाद्याने स्वतःला उडवलं, दुसरा चकमकीत ठार 

Blast Gunfire Near Turkey Parliament building government says its a terrorist attack
Blast Gunfire Near Turkey Parliament building government says its a terrorist attack

तुर्कीची राजधानी अंकारा येथे पोलीस मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी येथे संसदेच्या जवळ मोठा स्फोट झाला आहे. मीडिया रिपोर्टनुसार दहशतवाद्यांनी अंकारा येथील मंत्रालयाच्या इमारतींसमोर केल्याल्या बॉम्ब हल्ल्यात एका दहशतवाद्याचा स्फोटात मृत्यू झाला तर दुसरा सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईदरम्यान चकमकीत मारला गेला.

तुर्कीचे मंत्री अली येरलिकाया यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले की, हे दोन दहशतवादी कमर्शियल वाहनाने राष्ट्रीय पोलीस मुख्यालयाच्या इमारतीजवळ आले आणि त्यापैकी एकाने स्वत:ला उडवले. तर दुसरा दहशतवादी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. याशिवाय कारवाईदरम्यान दोन पोलीस अधिकारीही किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान या हल्ल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Blast Gunfire Near Turkey Parliament building government says its a terrorist attack
Sharad Pawar : NCPच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर दावा सांगणाऱ्या अजित पवार गटाला शरद पवारांचे उत्तर; म्हणाले...
Blast Gunfire Near Turkey Parliament building government says its a terrorist attack
Commercial LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या काळात महागाईचा मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडर 'इतक्या' रुपयांनी महागले

या स्फोटात किती लोक जखमी झाले आहेत आणि किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची माहिती मिळालेली नाहीये. तसेच या परिसरात गोळीबाराचा आवाजही ऐकू आल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल होत आहेत. विशेष म्हणजे संसदेचे अधिवेशन सुरू होण्याच्या काही वेळापूर्वीच ही घटना घडली.

अल जझीराच्या वृत्तानुसार, तुर्कस्तानमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर आजपासून संसद सुरू होत आहे. संसद भवन आणि गृह मंत्रालयाच्या इमारतीजवळ ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणाभोवती सुरक्षा कडक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com