पाकिस्तानमध्ये मतदानादरम्यान स्फोट; किमान 22 ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकांमधील हिंसाचाराची 'परंपरा' यंदाही कायम राहिली आहे. क्वेट्टा येथे मतदान केंद्राबाहेर झालेल्या स्फोटात किमान 22 जण ठार झाले आहेत. पोलिसांच्या ताफ्याला लक्ष्य करून हा दहशतवादी हल्ला झाल्याचे प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे आहे. पाकिस्तानमधील अशांत प्रांत असलेल्या बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टामध्ये हा स्फोट झाल्याने या देशासमोरील सुरक्षेचे आव्हान किती गंभीर आहे, हे पुन्हा उघड झाले आहे. 

पाकिस्तानमध्ये आज (बुधवार) 272 जागांसाठी मतदान होत आहे. लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या एका सरकारकडून निवडणुकीच्या माध्यमातून दुसऱ्या सरकारकडे सत्ता सोपविली जाण्याची घटना पाकिस्तानमध्ये केवळ दुसऱ्यांदा घडत आहे. या निवडणुकीसाठी पाकिस्तानी लष्कराने तीन लाख 70 हजारांहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. हादेखील आतापर्यंतचा विक्रमच आहे. 

दुसरीकडे, 'अवामी नॅशनल पार्टी' आणि इम्रान खान यांच्या 'तेहरिक-ए-इन्साफ' पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आज सकाळी धुमश्‍चक्री झाली. या वेळी झालेल्या गोळीबारात एक ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी हाफीज सईदनेही मतदान केले आहे. सईदने यंदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा प्रयत्न केला होता. पण त्याच्या पक्षावर बंदी लादण्यात आल्याने त्याला निवडणुकीत थेट भाग घेता आला नाही. आता सईदने दुसऱ्या एका पक्षाला जाहीर पाठिंबा देत त्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचारही केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blast in Pakistan during voting for General Assembly