Boat Accident : बांगलादेशमध्ये नदीत बोट उलटून 24 जणांचा मृत्यू

हिंदू मंदिराच्या दर्शनासाठी गेले असताना हा अपघात घडल्याची माहिती आहे.
boat carrying civilians through the flood of River Tapi.
boat carrying civilians through the flood of River Tapi.esakal

ढाका : बांग्लादेशातील उत्तरेकडे असलेल्या पंचगढ जिल्ह्यात रविवारी नदीत बोट उलटल्याने २४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर अनेकजण बेपत्ता झाल्याची माहिती आहे. एका हिंदू मंदिराच्या प्रार्थनेसाठी जात असताना हा अपघात झाल्याची माहिती आहे.

(Bangladesh Boat Accident 24 Death)

अधिक माहितीनुसार, बांग्लादेशातील हिंदू धर्मीय लोक एका मंदिराच्या दर्शनासाठी जात होते. बोडा येथील उपजिल्ह्याच्या औलिरिया घाट येथे हा अपघात झाला. बोडा, पंचपीर, मारिया आणि बांघारी भागातील हिंदू समाजातील लोक महालयाच्या निमित्ताने औलिया घाटातून बधेश्वर मंदिराच्या दिशेने बोटीतून प्रवास करत प्रार्थना करण्यासाठी जात होते. यावेळी ही दुर्घटना घडली आहे. यातील काही प्रवाशांना वाचवण्यात यश आले असून काही जण बेपत्ता आहेत.

boat carrying civilians through the flood of River Tapi.
MLA Madhuri Misal यांना खंडणीची मागणी; पैसे न दिल्यास दिराच्या खुनाची धमकी

दरम्यान, या बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले असल्याने ही बोट नदीच्या किनाऱ्यावर पोहोचण्याआधी उलटली. माहिती मिळताच पंचगडचे उपायुक्त मोहम्मद जहुरुल इस्लाम यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांचा सामावेश असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर बोडा पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सुजॉय कुमार रॉय यांनी सांगितले की, बेपत्ता लोकांच्या सुटकेसाठी शोध मोहीम सुरू केली आहे. सुटका करण्यात आलेले प्रवासी आणि बेपत्ता लोकांची संख्या ३० पेक्षा जास्त असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय पथक तयार करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com