esakal | ढाक्यात नौका उलटून ३२ प्रवाशांना जलसमाधी 

बोलून बातमी शोधा

ढाक्यात नौका उलटून ३२ प्रवाशांना जलसमाधी 

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी नौका बडीगंगा नदीत उलटून ३२ प्रवासी बुडाले. ‘मॉर्निंग बर्ड’ नावाच्या या नौकेत १०० प्रवासी होते. तिला दुसऱ्या नावेची धडक बसल्याने ती नदीत उलटली.

ढाक्यात नौका उलटून ३२ प्रवाशांना जलसमाधी 
sakal_logo
By
पीटीआय

ढाका- क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणारी नौका बडीगंगा नदीत उलटून ३२ प्रवासी बुडाले. यात तीन मुलांचा समावेश आहे. ‘मॉर्निंग बर्ड’ नावाच्या या नौकेत १०० प्रवासी होते. तिला दुसऱ्या नावेची धडक बसल्याने ती नदीत उलटली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

ही दुर्घटना श्‍यामबाजार येथे सोमवारी सकाळी घडली. चालकांच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याचा प्रथामिक निष्कर्ष पोलिसांनी काढला. दोन्ही बोट चालकांना प्रवाशांना बोटीतून उतरवून पुन्हा दुसरे प्रवासी बोटीत घेण्याची घाई झाली होती. यातून हा अपघात झाला.  अपघातानंतर दोन्ही बोटींच्या चालकांनी पळ काढला. अपघात घडल्यानंतर काही वेळातच बचावपथकाने शोध मोहिम सुरु केली. यामध्ये त्यांना ३२ मृतदेह सापडले, तर बाकींच्या शोध सुरु आहे. रात्री उशीरापर्यंत ही मोहिम सुरु होती. सीसीटीव्ही फुटेजवरून हा अपघात ठरवून केला गेल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

बांग्लादेश

बांगलादेश

ढाका