मोठी बातमी : बालाकोटमध्ये खरंच 200 दहशतवादी ठार झाले!

वृत्तसंस्था
बुधवार, 13 मार्च 2019

वॉशिंग्टन : भारताने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने दहशतवादी मारले गेल्याचे मान्य केले नाही. तसेच या हल्ल्यात फक्त काही झाडं पडल्याचेही पाकने म्हटले होते. परंतु, आता 200 दहशतवाद्यांचे मृतदेह बालाकोटमधून खैबर पख्तुनख्वामध्ये नेण्यात आल्याची पाक सैन्याची माहिती अमेरिकेत असलेल्या गिलगीटमधील कार्यकर्त्याने केली ट्विट आहे. यामध्ये एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. 

या ट्विटमध्ये, भारताने एअरस्ट्राईक केल्यानंतर पाकिस्तानी सैन्याच्या अधिकाऱ्यांनी 200 पेक्षा अधिक दहशतवाद्याना पुरल्याचे कबुल केले आहे. 

व्हिडिओमध्ये काही पाक सैन्याचे अधिकारी स्थानिक लोकांशी लोकांशी बोलत आहेत. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबाबत माहिती मिळू शकलेली नाही. 

पाकिस्तानने हल्ला झाल्यानंतर दहशतवादी मारले गेल्याचा दावा फेटाळला असला तरी, पाकने बालाकोट येथे जाण्यापासून प्रसार माध्यमांना रोखले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेलाही हल्ल्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात आले होते. 

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आमचे काहीही नुकसान झाले नाही, जगभरातल्या प्रसार माध्यमांनी हल्ल्याच्या जागी येऊन खुशाल खात्री करावी, असे म्हटले होते. मात्र पाकिस्तानी लष्कराने प्रसार माध्यमांना रोखल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bodies shifted from Balakot to Khyber Pakhtunkhwa after IAF strike US-based activist from Gilgit