इथोपियामध्ये बोईंग विमान कोसळले, मृतांमध्ये 4 भारतीयांचा समावेश 

वृत्तसंस्था
सोमवार, 11 मार्च 2019

अदिस अबाबा : इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून, या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात चार भारतीय प्रवासी देखील होते. मृतांमध्ये त्यांचाही समावेश आहे. 

इथोपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737-800 एमएएक्स या विमानाने स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. त्यानंतर 15 ते 20 मिनिटानंतर हे विमान अदिस अबाबाजवळ कोसळले.

हे विमान इथोपियाची राजधानी अदिस अबाबा येथून केनियाची राजधानी नैरोबी येथे जात होते. या विमानात 8 क्रू मेम्बर्स आणि 149 प्रवासी होते. या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली आहे.

इथोपियन एअरलाइन्सने याबाबत दिलेल्या माहितीनुसार, "8.30 वाजता उड्डाण केलेल्या या विमानाचा 8.45 च्या दरम्यान कंट्रोल रुमशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान अदिस अबाबाजवळ कोसळले. बचाव कार्य सुरु करण्यात आले असून. प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी माहिती केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसे इथोपियन एअरलाइन्सने आपतकालीन फोन क्रमांकदेखील जाहीर केले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boeing’s top-selling plane raises safety concerns after second deadly crash in 5 months