ब्राझीलनंतर 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

  • बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण
  • होम आयसोलेशनमधून काम सुरू ठेवणार

ला पाझ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. अशात आणखी एका राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण झाली असून आता बोलिवियाच्या राष्ट्राध्यक्षा जिनिन अंज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून खुद्द त्यांनीच याबाबत माहिती दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

जिनीन अंज म्हणाल्या 'मी कोरोनाची चाचणी केली होती. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच सध्या त्या होम आयसोलेशमध्ये राहणार आहेत. यासोबतच त्या आपलं कामही सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोनाच्या रुग्णसंख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.

दरम्यान, ब्रिझिलचे राष्ट्राध्यक्ष जे. बोलसेनारो, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि मोनाकोचे प्रिन्स अलबर्ट द्वितीय यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, आता या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. बोरिस जॉन्सन यांना मार्च महिन्यात काही दिवसांसाठी उपचाराच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान, बोलिवियामध्ये आतापर्यंत ४३ हजारांपेक्षा अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत १ हजार ५०० जणांना करोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत.

भारतातही मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देशात गेल्या २४ तासांत २४ हजार ८७९ रुग्णांची वाढ झाली आहे. भारतातील रुग्णांची संख्या आता संख्या ७ लाख ६७ हजार २९६ झाली आहे. आत्तापर्यंत ४ लाख ७६ हजार ३७६ रुग्ण बरे झाले असून गेल्या २४ तासांमध्ये ही संख्या १९ हजार ५४७ होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६२.०९ टक्क्यांवर पोहोचले आहे. २ लाख ६९ हजार ७८९ रुग्ण उपचाराधीन आहेत. गेल्या २४ तासांमध्ये २ लाख ६७ हजार ६१ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण १ कोटी ७ लाख ४० हजार ८३२ चाचण्या करण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bolivias President Anez has tested positive for coronavirus