Pakistan Bomb Blast
Pakistan Bomb BlastEsakal

Pakistan Bomb Blast: पाकिस्तानात दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनवर बॉम्ब हल्ला! 12 कर्मचारी ठार, 50 जखमी

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेवक दु:ख व्यक्त करत हल्लेखोरांचा निषेध केला

पाकिस्तानच्या स्वातमधील दहशतवादविरोधी विभागाच्या पोलीस स्टेशनमध्ये काल (सोमवारी) आत्मघातकी बॉम्ब हल्ला झाला. या हल्यात किमान 12 पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जिओ टीव्हीने पोलिसांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पोलीस ठाण्यात दोन स्फोट होऊन संपूर्ण इमारत उद्ध्वस्त झाली असेही पोलिसांनी सांगितले आहे.(Pakistan news)

जगभरात दहशतवाद पसरवण्यात हात असणाऱ्या पाकिस्तानलाच आता याचा फटका सहन करावा लागत आहे. स्वात जिल्ह्यात काल (सोमवारी) रात्री एका पोलीस ठाण्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. या पोलीस ठाण्यात दहशतवादविरोधी विभागाचे (CTD) कार्यालय आहे. त्याठिकाणी हल्ला झाला. या हल्ल्यात 12 पोलीसांचा मृत्यू झाला, असून 50 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हणत शोध मोहीम राबविण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे.

Pakistan Bomb Blast
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रचार साधेपणाने

पाकिस्तानातील स्वात जिल्ह्याचे डीपीओ स्वात शफीउल्ला यांनी सांगितले की, हा स्फोट सीटीडीच्या स्वात जिल्ह्यात कबाल पोलीस ठाण्यामध्ये झाला. या स्फोटामुळे तीन इमारती कोसळल्या आणि त्यानंतर भीषण आग लागली. हा आत्मघाती हल्ला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. तसेच या हल्ल्यात एकूण 12 पोलिसाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.

Pakistan Bomb Blast
Sudan Crisis : सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी'!

स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (सोमवारी) रात्री 8.20 वाजता हा हल्ला झाला. आत्मघातकी हल्लेखोराने पोलीस ठाण्यातच स्वत:ला उडवून घेतलं. या पोलीस ठाण्याच्या आवारात सीटीडीचे कार्यालय आणि मशीद बांधली आहे. या हल्ल्यानंतर संपूर्ण खैबर पख्तूनख्वाह प्रांतात सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

हल्ला झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या इमारती कोसळल्या. या घटनेत ढिगाऱ्याखाली दबून अनेक लोक जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे सर्व जखमींवर उपचार सुरू असून जखमींची संख्या वाढण्याची शक्यता पाहता जवळच्या रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

Pakistan Bomb Blast
Kathmandu Dubai Flight Fire: विमानाला आग, 120 प्रवाशांचा जीव टांगणीला! दुबईत असं झालं लँडिंग

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेनंतर दु:ख व्यक्त करत हल्लेखोरांचा निषेध केला आहे. शरीफ यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हंटलं आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानातील जनता शहीदांचे बलिदान कधीही विसरणार नाही. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कारवाई करून त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा दिली जाईल. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com