
'ब्रा' हे एक असं अंतर्वस्त्र आहे ज्याचं नाव लोक सहज आणि उघडपणे घेत नाहीत. ब्राची स्ट्रीप जरी दिसली तरी माणसांत पुरूषार्थ जागवणारं हे अंतर्वस्त्र नेमकं आलं कुठून असाही प्रश्न नक्कीच कधीतरी कोणाला पडला असावा. मात्र मूळात या अंतर्वस्त्राचा उगम कुठून झाला हे फार कमी लोकांना माहिती आहे. (Where this bra concept come from)
ब्रा या अंतर्वस्त्राचा विचार केला तर सगळ्यात आधी डोक्यात विचार येतो की ब्रा नेमकी का घातली जाते. मात्र याचं प्रत्येकाला पटेल असं कोणी उत्तर अजूनतरी दिलेलं नाही. तसेच ब्रा घालण्याबाबत कुठलंही सायन्टिफिक कारणही स्पष्ट नाही. साधारणत: स्तनांचा आकार सुडौल दिसण्यासाठी आणि त्यांना सपोर्ट देण्यासाठी महिला ब्रा घालतात. तसेच काही रिपोर्टनुसार रेड बोन्स संबंधित समस्यांना रोकण्यासाठीही ब्रा मदत करते.
५०० वर्ष जुना इतिहास
ब्रा बद्दल बोलायचं झाल्यास त्याचा इतिहास ५०० वर्ष जुना असल्याचं सांगितल्या जातं. दरम्यान एवढ्या वर्षात या अंतर्वस्त्राने त्याची वेगवेगळी रूपं घेतलीत. आजच्या महिला ब्राचा उपयोग अत्यंत आधुनिक पद्धतीने करतात. जुन्या काळात म्हटलं जातं की महिला चामड्याच्या ब्रा घालायच्या. चामड्याच्या ब्रा घालणं फार कठीण असायचं मात्र स्तनांना झाकण्यासाठी त्या या ब्राचा वापर करायच्या. सोबतच चामड्याच्या ब्रा बॉडीला शेप देण्यासाठी फायदेकारी होत्या. ग्रीक आणि युनानी संस्कृतीमध्ये ब्रेस्ट बँड घातले जात असल्याचा उल्लेख करण्यात आलाय.
भारतात मात्र ब्राचं चलन फार जुनं नाही. महिला आधी त्यांनी घातलेल्या साडीचा उपयोग त्यांच्या स्तन झाकण्यासाठी करत असे. ६ व्या शतकात हर्षवर्धन राजाच्या राज्यात चोळी म्हणजेच ब्लाऊजची प्रथा आली. १२ व्या शतकात युरोपमध्ये धातूपासून बनलेल्या कॉर्सेटचा उपयोग केल्या गेला. १८९० दरम्यान येथील महिलांनी कापडांचे बनलेले कॉर्सेट घालण्यास सुरूवात केली. मात्र याने महिलांच्या शरीरात अनेक त्रास सुरू झाले. आणि ही कल्पना अयशस्वी ठरली.
यानंतर आली माडर्न ब्रा. ज्याचा उगन फ्रांसमध्ये झाला होता. ब्रा हे नाव फ्रेंचमधील 'brassiere'या शब्दातून घेतले आहे. १९१५-२० मध्ये मार्केटमध्ये सेमी कप ब्रा उदयास आली. १९४० च्या दरम्यान मार्केटमध्ये नव्या पद्धतीच्या ब्रा आल्या. त्याला बुलेट ब्रा असं म्हटल्या जातं. याचा वापर बॉलीवुडच्या अनेक अभिनेत्री करताना दिसल्या.
ब्राचा विरोधही करण्यात आला
ब्राला प्रसिद्धी देण्यामागे फेमस मॅक्झिन 'Vogue'ची खूप मोठी भूमिका आहे. मात्र या मॅक्झिनमधील 'brassiere'या शब्दाला चांगलाच विरोध झाला. महिला संघटनांनी ब्रामुळे होणारे नुकसान सांगत महिलांना सावध केलं. यावर आंदोलनेही झालीत. ब्रा घातल्याने ब्रेस्ट कॅन्सर होते तसेच याचा ब्रा घातल्याने महिला एक सेस्क ऑब्जेक्ट म्हणून बघितल्या जाते असं आंदोलकांचं म्हणणं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.