मेंदू खाणाऱ्या अमिबाने 6 वर्षाच्या मुलाचा घेतला जीव; अमेरिकेत हाय अलर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, 29 September 2020

अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा  (brain-eating amoeba)  सापडल्याचे समोर आले होते.

वॉशिंग्टन- अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील दक्षिणपूर्व भागात पाण्याच्या पुरवठा साखळीमध्ये अमिबा  (brain-eating amoeba)  सापडल्याचे समोर आले होते. याच संदर्भात एक धक्कादायक बातमी कळत आहे. पाण्यात असणाऱ्या या प्राणहातक अमिबामुळे एका 6 वर्षाच्या लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. जोसिया मॅकेन्टायरे Josiah McIntyre असं त्या मुलाचं नाव असून तो लेक जॅकसन भागातील राहणारा होता. मुलाच्या मृत्यूमुळे टेक्सास प्रांतात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

World Heart Day 2020 - छातीत दुखणं एवढं एकच नाही हार्ट अटॅकचं लक्षण

जोसिया घरामध्ये पाण्यासोबत खेळला होता. तो आजारी पडल्याने त्याला दवाखाण्यात दाखल करण्यात आले होते. तपासानंतर त्याच्या मेंदूला इंफेक्श झाल्याचे समोर आले. या घटनेनंतर टेक्सान सरकारने हाय अलर्ट जारी केला. आठ शहरांच्या नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. पाण्यातील हा अमिबा मेंदू खाणारा आहे. सर्वांनी खबरदारी घ्यावी अन्यथा यामुळे मोठे नुकसान होऊ शकते, अशी चेतावणी टेक्सास प्रशासनाने दिली आहे. टेक्सास कमीशनने पर्यावरण गुणवत्तेच्या आधारे वॉटर अॅडवायझरी जारी केली आहे. पाण्यामध्ये नाइगेलेरिया फाऊलेरी म्हणजेच मेंदू खाणारा अमिबा आहे, त्यामुळे पाण्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.  

कुठे सापडतो अमिबा

अॅडवायझरीमध्ये म्हणण्यात आलंय की, टेक्सास कमीशन पर्यावरण गुणवत्तेला लक्षात घेऊन ब्राजोस्पोर्ट वॉटर अथॉरिटीसोबत पाण्याची सध्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे.  सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रीवेंशननुसार, मेंदू खाणारा हा अमीबा साधारणपणे माती, गर्म पाण्याचे डबके, नदी आणि गरम झऱ्याच्या पाण्यामध्ये आढळतात. स्वच्छतेची कमतरता असलेल्या स्वीमिंग पूलमध्येही हा अमिबा आढळतो. शिवाय औद्यागिक कारखाण्यांमधून निघणाऱ्या गरम पाण्यामध्येही अमिबा सापडतो.

कोरोना, ब्रुसेलोसिस आणि आता कॅट क्यू व्हायरस? नव्या विषाणूबद्दल आयसीएमआरची...

लोकांना पाणी न वापरण्याच्या सूचना

लेक जॅकसन, फ्रीपोर्य ऐंगलटन, ब्राजोरिया, रिचवुड,  आयस्टर क्रीक, क्लूट आणि रोजनबर्ग भागात पाणी न वापरण्यास सांगण्यात आलं आहे. अमिबायुक्त पाण्याच्या वापरामुळे मोठा अनर्थ ओढवू शकतो, अशा सूचना लेक जॅकसन भागात जारी करण्यात आल्या आहेत. शिवाय या भागातील पाण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी अॅडवायझरी जाहीर करण्यात आल्या आहेत. लोकांना नाकात किंवा तोंडात पाणी जाऊ नये यासाठी काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे. विषेश करुन लहान मुलांना पाण्यापासून दूर ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brain Eating Amoeba Kills 6 Year Old in america Texas On Alert