Plane Crash: 4 खेळाडूंसह ब्राझिलियन फुटबॉल क्लबच्या अध्यक्षांचा मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 25 January 2021

पाल्माज फुटबॉल क्लबचे अध्यक्ष आणि क्लबच्या चार खेळाडूंचा प्लेन अपघातात मृत्यू झाला आहे.

ब्राझिलिया- पाल्माज फुटबॉल क्लबचे अध्यक्ष आणि क्लबच्या चार खेळाडूंचा प्लेन अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे फुटबॉल जगतात शोककळा पसरली आहे. रविवारी ही दुर्घटना घडली असून प्लेनच्या लॅडिंगवेळी हा अपघात घडला. 'न्यूज 18' ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

क्लबने दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्ष लुकास मैईरा Lucas Meira यांच्यासह लुकास पॅर्सेडेस Lucas Praxedes, गुलहेरमे नोई Guilherme Noe, रानुले  Ranule आणि मार्कस मोलीनारी Marcus Molinari यांचा मृत्यू झाला आहेत. पायलट असणाऱ्या वॅगनर याचाही मृत्यू झाला आहे. 

एक छोटे प्लेन गोईनियाकडे स्पर्धेसाठी निघाले होते. Tocantinense Aviation Association च्या रनवेवर उतरताना प्लेनचा अपघात झाला. प्लेन नेमकं कोणत्याप्रकारचे होते हे क्लबकडून सांगण्यात आलेलं नाही. 

दरम्यान, गेल्या काही वर्षातील ब्राझिलमधील हा दुसरा मोठा अपघात आहे. 2016 मध्ये जवळपास पूर्ण Chapecoense squad चा मृत्यू झाला होता. स्क्वाडला घेऊन प्लेन कोपाला निघाले होते. त्याठिकाणी त्यांची फायनल फूटबॉल स्पर्धा होती. दोन वर्षांपूर्वी माजी कॅप्टन फर्नांडो यांचे गोईसमध्ये हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Brazilian Club Palmas President Four Players Die in Plane Crash